महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम

06:29 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

रविवारी येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लिग फिल्ड आणि ट्रॅक स्पर्धेत पुरूषांच्या 3 हजार मीटर स्टिपलचेस क्रीडा प्रकारात भारताचा धावपटू अविनाश साबळेने यापूर्वी स्वत:च नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. मात्र पुरूषांच्या भालाफेकमध्ये भारताच्या किशोर जेनाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरूषांच्या 3000 मि. स्टीपल चेस प्रकारात 29 वर्षीय साबळेने 8 मिनीटे 9.91 सेकंदांचा अवधी घेत यापूर्वी स्वत:चा नोंदविलेला 8 मिनीटे 11.20 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला. या क्रीडा प्रकारात इथोपियाच्या अब्dराहम सिमेने 8 मिनीटे 02.36 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान तर केनियाच्या सिरेमने दुसरे व केनियाच्या किबीओटने तिसरे स्थान पटकाविले. भारताचा अविनाश साबळे पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत आहे. पुरूषांच्या भालाफेक प्रकारात भारताचा भालाफेकधारक किशोर जेनाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 78.10 मीटरचा भालाफेक केला. या स्पर्धेत भारताचा भालाफेकधारक निरज चोप्राने आपला सहभाग दर्शविला नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबर 85.91 मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक तर ग्रेनेडाच्या पिटर्सने 85.19 मीटर भालाफेक करत रौप्य आणि झेकच्या जेकुब व्हॅडेलेजने 85.04 मीटर भालाफेक करत कास्य पदक मिळविले.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article