महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिपा कर्माकरचा नवा इतिहास

06:06 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /ताश्कंद

Advertisement

आशियाई वरिष्ठांच्या चॅम्पियनशीप स्पर्धेत रविवारी येथे भारताची अव्वल महिला जिमनॅस्ट दिपा कर्माकरने जिमनॅस्टीक प्रकारात नवा इतिहास घडवला असून तिने सुवर्णपदक पटकाविले.

Advertisement

या स्पर्धेत महिलांच्या व्हॉल्ट जिमनॅस्टीक प्रकारात 30 वर्षीय दिपाने 13.566 सरासरी गुण नोंदवित सुवर्णपदक हस्तगत केले. उझ्बेकच्या राजधानीतील या स्पर्धेचा रविवार शेवटचा दिवस होता. या क्रीडा प्रकारात उत्तर कोरियाच्या किम सॉन हेयांगने 13.466 गुणासह रौप्यपदक तसेच उत्तर कोरियाच्या जो केयांग बायोईने 12.966 गुणासह कास्य पदक मिळविले. 2016 च्या रिओ ऑलंपिक स्पर्धेत दिपा कर्माकरचे पदक थोडक्यात हुकले होते. तिला या क्रीडा प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 2015 साली झालेल्या आशियाई वरिष्ठांच्या चॅम्पियनशीप स्पर्धेत दिपा कर्माकरने कास्य पदक घेतले होते. तसेच आशिश कुमारने वैयक्तीक फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात कास्य पदक घेतले होते. 2019 आणि 2022 च्या आशियाई वरिष्ठांच्या चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या प्रणाती नायकने कास्य पदक पटकाविले होते. भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळातर्फे दिपा कर्माकरचे खास अभिनंदन करण्यात आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article