चीनमध्ये पुन्हा पसरला नवा आजार, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
कोरोनाच्या संकटानंतर चीनमध्ये पुन्हा एकदा नवी महामारी वेगाने पसरत आहे. चीनमधील शाळांमध्ये वेगाने हा आजार पसरत आहे. हा एका प्रकारचा गूढ न्यूमोनिया असून मुलांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. ज्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चीनमधील अनेक शाळा बंद करण्यात येणार आहेत.
चीनमधील ५०० मैल उत्तर-पूर्वेच बीजिंग आणि लियाओनिंग येथील रुग्णालयात आजारी मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेकडून या आजाराबद्दल चीनकडून माहिती मागवल्याचे वृत्त समोर आले आहे.
या आजारात फुफ्फुसात सूज येणे आणि तीव्र ताप यासह असामान्य लक्षणे दिसून येतात. जगभरात मानवी आणि प्राण्यांच्या आजारांच्या उद्रेकावर लक्ष ठेवणाऱ्या ओपन ॲक्सेस सर्व्हेलन्स प्लॅटफॉर्म प्रोमेडने चीनमध्ये पसरणाऱ्या या गूढ न्यूमोनियाबाबत इशारा दिला आहे.