महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बहरोडच्या आमदाराला चप्पलांचा हार

05:33 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानच्या बहरोडचे आमदार आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे बलजीत यादव यांना काही लोकांनी चप्पलांचा हार घातल्याने वाद निर्माण झाला आहे. यादव हे मतदारसंघातील गादोज गावात जनसंपर्क करत असताना अचानक काही लोक आले आणि त्यांनी आमदाराला प्रथम पुष्पहार घातला आणि मग काही क्षणातच चप्पलांचा हार घातला आहे.यादव यांना चप्पलांचा हार घातला गेल्यावर ग्रामस्थ आणि आमदारांच्या समर्थकांदरम्यान झटापट झाली. परंतु आमदारांच्या समर्थकांनी चप्पलांचा हार घातला गेला नसल्याचा दावा केला आहे. विरोधी गटाच्या काही लोकांनी चप्पलांचा हार घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना रोखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  पोलिसांनुसार राजपाल यादवने आमदारांच्या गळ्यात चप्पलांचा हार घातला. तसेच याकरता त्याला दोन जणांचे सहकार्य मिळाले. पोलिसांनी राजपाल तसेच त्याचे दोन साथीदार देवेंद्र आणि राजेंद्र यांना शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेनंतर गावात निमलष्करी दलाने संचलन केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article