महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंतराळातून घरात कोसळली रहस्यमय वस्तू

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

छताला पाडले मोठे छिद्र

Advertisement

फ्लोरिडात एका व्यक्तीच्या घरावर अचानक आकाशातून एक वस्तू कोसळली आहे. या वस्तूने त्यांच्या दोन मजली इमारतीच्या छताला मोठे छिद्र पाडले आहे. प्रथम पहिल्या मजल्यावर छिद्र पडले, त्यानंतर एका मुलाच्या खोलीत ही वस्तू कोसळली आहे. या व्यक्तीने ट्विटर हँडलवर याची माहिती दिल्यावर नासाकडून यासंबंधी विस्तृत तपासणी केली जात आहे. ही वस्तू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून कोसळलेला कचरा असल्याचे मानले जात आहे. फ्लोरिडाच्या नेपल्समध्ये राहणारे अलेजांड्रो ओटेरो यांनी 8 मार्च रोजी आकाशातून रहस्यमय वस्तू कोसळली होती. या वस्तूमुळे आमच्या छताचे नुकसान झाले होते. नासाकडून 2021 मध्ये अंतराळ स्थानकावर पाठविण्यात आलेल्या कार्गो पॅलेटची ही जुनी बॅटरी असल्याचे वाटते असे अलेजांड्रो यांनी म्हटले आहे. ही वस्तू पृथ्वीच्या वातावरणात शिरताच जळून खाक होईल असे मानले जात होते, परंतु तसे घडले नाही. ही वस्तू 8 मार्च रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता अलेजांड्रो यांच्या घरावर कोसळली. अलेजांड्रो यांच्या ट्विटवर प्रसिद्ध एस्ट्रोफिजिसिस्ट जोनाथन मॅक्डॉवल यांनी पुष्टी दिली. आकाशातून एक वस्तू खाली येताना पाहिली गेली होती असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

बॅटरीचा तुकडा

ईपी-9 बॅटरी पॅलेटचा हा तुकडा असण्याची शक्यता आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या वैज्ञानिकांनी अलेजांड्रो यांच्या घरातून हा तुकडा मिळविला आहे. यासंबंधी तपासणी होत आहे. ही वस्तू प्रत्यक्षात अंतराळ स्थानकातून आली आहे का कुठल्याही ग्रह किंवा लघुग्रहाचा हा तुकडा आहे हे त्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले.

जबाबदारी कोण स्वीकारणार?

हा तुकडा बॅटरी पॅलेटचा असल्याचे काही वैज्ञानिकांचे मानणे आहे, परंतु याचे प्रक्षेपण जपानी अंतराळ संस्थेने केले होते. याचमुळे आता याच्या कोसळण्याची जबाबदारी नासा स्वीकारणार का जपानी अंतराळ संस्था जाक्सा स्वीकारणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी 2022 मध्ये स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलचा हिस्सा ऑस्ट्रेलियाच्या एका शेतात कोसळला होता.

अंतराळात हजारो मोठे तुकडे

चीनच्या लाँग मार्च रॉकेटचे तुकडे जमिनीवर कोसळत असतात. याप्रकरणी चीनवर जगभरातून टीका होत असते. पृथ्वीच्या चहुबाजूला फिरत असलेले 30 हजारांहून अधिक कचऱ्याचे तुकडे पृथ्वीवर कोसळू शकतात का यावर जगभरातील अंतराळ संस्था नजर ठेवून आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article