पाणी मागे हटणारे रहस्यमय सरोवर
जगातील सर्वात जुने सरोवर
लेक जॉर्ज जगातील सर्वात जुन्या सरोवरांपैकी एक आहे. हे सरोवर ऑस्ट्रेलियात पॅनबरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर फेडरल हायवेला लागून आहे. या सरोवराचे पाणी एकाच रात्रीत काठापासून एक किलोमीटरपर्यंत मागे सरकते आणि मग रहस्यमय पद्धतीने गायब होत असल्याचे कहाणी येथे सांगण्यात येते. लेक जॉर्ज सरोवरात पाणी कधी येते आणि कुठे गायब होते हे कळतच नाही. सरोवर जेव्हा पूर्णपणे भरलेले असते, तेव्हा 155 चौरस किलोमीटरमध्ये फैलावत असते. याचा पूर्व दिशेकडील काठ फेडरल हायवेला लागतो, परंतु हे सरोवर कोरडे पडल्यावर याच्या खुणाही दिसून येत नाहीत. मग या कोरड्या सरोवरातील जमिनीवर गुरांना चरण्यासाठी सोडले जात असते.
खाऱ्या पाण्याचे सरोवर
लेक जॉर्ज जगातील सर्वात जुन्या सरोवरांपैकी एक आहे. याची निर्मिती 10 लाख वर्षांपेक्षाही अगोदर झाली होती असे मानले जाते, या सरोवराचे पाणी समुद्रासमान खारट आहे. 1800 च्या दशकाच्या प्रारंभी सरोवर अत्यंत मोठे होते, परंतु 1840 च्या दशकात हे इतके कोरडे पडले की, याच्या मधून गाडी चालवून ते पार करू शकत होता. 1971 मध्ये हे सरोवर अखेरचे पूर्णपणे भरले होते. 1960 च्या दशकाच्या अखेरीस जॉर्ज सरोवर जवळपास आटले होते, 1986 मध्ये सरोवर पुन्हा आटले आणि मग 1996 मध्ये पुन्हा भरून गेले. मग 2002-10 पर्यंत पूर्णपणे आटून गेले आणि 2016 मध्ये सरोवरात मोठ्या प्रमाणात पाणी दिसून आल्याचे ऑस्ट्रेलियन भूवैज्ञानिक पॅट्रिक डी डेकर यांनी सांगितले आहे.
लेक जॉर्जचे रहस्य
लेक जॉर्जचे पाणी आटणे आणि मग पुन्हा पाणी येणे दीर्घकाळापासून एक रहस्य होते, सरोवराला पाणी एका गुप्त भूमिगत झऱ्यांमुळे मिळत असल्याचे काही लोकांचे मानणे होते. परंतु अधिक पाऊस पडल्यावर सरोवर भरून जात असल्याचे पॅट्रिक यांचे सांगणे आहे. सरोवराच्या रहस्यमय पद्धतीने भरण्याच्या आणि आटण्याच्या घटनांमुळे ऑस्ट्रेलियातील अनेक पिढ्या चकित झाल्या आहेत.