महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूरालिंक चिपद्वारे केवळ विचार करून चालविला माउस

06:22 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ब्रेन-चिप इम्प्लांट करविणारा पहिला मानवी रुग्ण पूर्णपणे तंदुरुस्त : एलन मस्क यांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

ब्रेन-चिप इम्प्लांट करविणारा पहिला मानवी रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे. हा रुग्ण केवळ विचार करून कॉम्प्युटर माउस देखील नियंत्रित करू शकतोय अशी माहिती एलन मस्क यांनी दिली आहे. न्यूरालिंकचे पुढील पाऊल अधिक कॉम्पलेक्स इंटरॅक्शनला सक्षम करणारे असून यात रुग्णाच्या विचारांद्वारे माउस बटनला नियंत्रित केले जाणार आहे. मानवी परीक्षण भरतीसाठी मंजुरी मिळाल्यावर मस्क यांच्या कंपनीने मागील महिन्यात स्वत:च्या पहिल्या मानवी रुग्णावर ब्रेन-चिप इम्प्लांट केले होते.

न्यूरालिंकने  रुग्णाच्या मेंदूत शस्त्रक्रियेद्वारे चिप इम्प्लांट केले होते. हे उपकरण एका छोट्या नाण्याच्या आकाराचे असून ते मानवी मेंदू आणि कॉम्प्युटरदरम्यान थेट कम्युनिकेशन चॅनेल निर्माण करते. कंपनीने या चिपला ‘लिंक’ हे नाव दिले आहे.

दृष्टीहीनांना पाहता येणार

या उपकरणाद्वारे तुम्ही केवळ विचार करून फोन, कॉम्प्युटर आणि अन्य कुठलेही उपकरण नियंत्रित करू शकणार आहेत. अवयव निकामी झालेले लोक याचे प्रारंभिक वापरकर्ते असतील. स्टीफन हॉकिंग आज असते, तर या उपकरणाच्या मदतीने एक स्पीड टायपिस्टच्या तुलनेत अधिक वेगाने कम्युनिकेट करू शकले असते असे मस्क यांनी म्हटले आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये मिळाली मंजुरी

ब्रेन-चिप कंपनी न्यूरालिंकला स्वत:च्या पहिल्या मानवी परीक्षणासाठी इंडिपेंडेंट इन्स्टीट्यूशनल रिह्यू बोर्डाकडून भरतीची मंजुरी मिळाली होती. न्यूरालिंक आता मानवी परीक्षणासाठी लोकांची भरती करून या उपकरणाचे परीक्षण करू शकणार आहे.

अध्ययन पूर्ण होण्यासाठी 6 वर्षे

न्यूरालिंकनुसार सर्वाइकल स्पायनल कॉर्डमध्ये ईजा किंवा एमियोट्रोफिक लेटरल स्क्वेलेरोसिसमुळे क्वाड्रिप्लेजिया झालेल्या लोकांवर हे परीक्षण केले जात आहे. या परीक्षणात भाग घेणाऱ्या लोकांचे वय कमीतकमी 22 वर्षे असणे आवश्यक आहे. अध्ययन पूर्ण होण्यासाठी सुमारे 6 वर्षे लागणार आहेत. यादरम्यान संबंधिताला लॅबपर्यंत ये-जा करण्यासाठी कंपनीकडून पूर्ण खर्च दिला जाणार आहे. हे उपकरण रुग्णांवर कशाप्रकारे काम करतेय हे कंपनी या परीक्षणाद्वारे पडताळून पाहणार आहे.

फोनला थेट मेंदूशी जोडणार

न्यूरालिंकने तयार केलेले हे उपकरण कॉम्प्युटर, मोबाइल फोन किंवा अन्य कुठल्याही उपकरणाला ब्रेन अॅक्टिव्हिटीशी (न्यूरल इम्पल्स) थेट नियंत्रित करण्यास सक्षम करणार आहे. पॅरालिसिसने पीडित व्यक्ती मेंदूत चिप प्रत्यारोपित केल्यावर केवळ विचार करून माउसचा कर्सर मूव्ह करू शकतील.

कॉस्मॅटिक स्वरुपात अदृश्य चिप

न्यूरालिंक ही कंपनी पूर्णपणे इम्प्लांटेबल, कॉस्मॅटिक स्वरुपात अदृश्य ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस डिझाइन करत आहे, याद्वारे कुठेही गेल्यास कॉम्प्युटर किंवा मोबाइल उपकरण नियंत्रित करता येणार आहे. मायक्रोन-स्केल थ्रेडला मेंदूच्या अशा क्षेत्रांमध्ये प्रत्यारोपित करण्यात येणार आहे, जेथे हालचालींचे नियंत्रण केले जाते. प्रत्येक थ्रेडमध्ये अनेक इलेक्ट्रोड असतील, जे त्यांना ‘लिंक’ नावाच्या इम्प्लांटशी जोडतात.

रोबोटिक प्रणाली

लिंकवर थ्रेड अत्यंत लवचिक असल्याने त्यांना मानवी हाताने इम्प्लांट केले जाऊ शकत नाही. याकरता कंपनीने एक रोबोटिक प्रणाली डिझाइन केले आहे, यामुळे थ्रेटला मजबुती आणि कुशलपणे इम्प्लांट केले जाऊ शकते. याचबरोबर न्यूरालिंक अॅप देखील डिझाइन करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून ब्रेन अॅक्टिव्हिटीशी थेट स्वत:चा कीबोर्ड आणि माउसला केवळ त्याविषयी विचार करून नियंत्रित करता येणार आहे. हे उपकरण चार्ज करण्याची गरज भासणार आहे. याकरता कॉम्पॅक्ट इंडक्टिव्ह चार्जर डिझाइन करण्यात आला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article