For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारने पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटर सायकलस्वार जागीच ठार!

01:00 PM Nov 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
कारने पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटर सायकलस्वार जागीच ठार
motorcyclist was killed
Advertisement

पुलाची शिरोली/वार्ताहर

मोटर सायकलला कारने पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटर सायकल स्वार उडून रस्त्यावर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.भरत बाळासो परीट वय वर्ष ४०, रा. हालोंडी ता. हातकणंगले असे मयत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावरील हालोंडी गावच्या हद्दीतील चंद्रप्रभा कापड दुकानासमोर मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान झाला.

Advertisement

परीट हा मौजे वडगाव फाट्यावरील सन इलेक्ट्रिकल्स या कंपनीत नोकरीस होता. तो मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान आपल्या मोटरसायकल वरून कामावर निघाला होता. तो कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावरील हालोंडी गावच्या हद्दीतील चंद्ररूप कापड दुकानाजवळ आला असता कोल्हापूरहून सांगलीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एक्स युव्ही कारणे पाठीमागून जोराची धडक दिल्याने जवळपास १०० फूट फरपटत जाऊन मोटर सायकल स्वार उडून डांबरी रस्त्यावर आपटला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. तर कारचे दोन्ही बाजूची एअर बॅग उघडल्याने कार मधील चालकासह प्रवासी सुदैवाने बचावले. भरत परीट हा एक मिनिटापूर्वीच घरातून बाहेर पडला होता आणि त्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.