सायनाइडने भरलेले खारटं सरोवर
वैज्ञानिकांसाठी ठरला आहे रहस्य
कॅलिफोर्नियाच्या पूर्व सिएरा नेवादामध्ये असलेले मोनो सरोवर खरोखरच पाहण्याजोगे आहे. पाण्याचे हे अनोखे आणि मनमोहक सरोवर जगात अन्यत्र कुठेच दिसून येणार आहे. निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांना हे सरोवर आकर्षित करत असते. याचा आकर्षक रंग, टूफा टॉवर्स नावाच्या अनोख्या चुनादगडाच्या संरचना आणि क्षारयुक्त पाणी याला पाहण्याजोगे स्वरुप देतात. मोनो सरोवर एक प्राचीन खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, ज्याचा इतिहास दहा लाख वर्षांपेक्षाही जुना आहे. उत्तर अमेरिकेच्या सर्वात जुन्या सरोवरांपैकी हे एक असून यात मिठाचे प्रमाण मृत सागराइतकेच आहे. सरोवराचा अत्यंत अधिक खारटपणा याला बहुतांश माशांच्या प्रजातींसाठी अयोग्य ठिकाण ठरविते, परंतु हे अद्वितीय झिंगा आणि क्षारीय माशांसाठी उत्तम ठिकाण आहे. मोनो सरोवर स्वत:च्या भीतीदायक आणि मनमोहक टूफा टॉवर्ससाठी प्रसिद्ध आहे. या अनोख्या कॅल्शियम कार्बोनेट संरचना पाण्याच्या पृष्ठभागावर दिसून येतात,
यामुळे एक अदभुत आणि आश्चर्यकारक दृश्य निर्माण होते, जे जगात कुठल्याही ठिकाणापेक्षा वेगळे आहे. टूफा टॉवर गोड्या पाण्यातील झरे आणि सरोवरातील क्षारयुक्त पाण्यामुळे निर्माण झाले आहेत. मोनो सरोवर 80 पेक्षा अधिक प्रवासी पक्ष्यांच्या प्रजातींसाठी घरटं निर्माण करण्याचे खास स्थान आहे. पक्षीप्रेमींसाठी याचमुळे हे सरोवर स्वर्ग ठरते. दरवर्षी हजारो पक्षी मोनो सरोवरात येतात, यात कॅलिफोर्निया गल, विल्सनचे फलारोप आणि स्नोई प्लोवर सामील आहे. मोनो सरोवर संशोधक आणि वैज्ञानिकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. हे एक भूवैज्ञानिक चमत्कार असून तो आश्चर्यकारक पर्वतरांगा आणि ज्वालामुखीय वैशिष्ट्यांनी वेढलेले आहे. हे लाँग व्हॅली काल्डेरा येथे असून प्रत्यक्षात हे सरोवर म्हणजे एक विशाल ज्वालामुखीय खड्डा असून तो 7 लाख वर्षांपूर्वी निर्माण झाला होता.सूर्यास्तावेळी मोनो सरोवराच्या ठिकाणी जाणे एक जादुई अनुभव आहे. आशाकातील जिवंत रंगांचे प्रतिबिंब एक मनमोहकदृश्य निर्माण करते, जे टूफा टॉवर्सच्या संरचनांमुळे अधिक सुंदर ठरते.