स्वत:च्या रक्तात लिंबाचा रस मिसळून पिणारी मॉडेल
सुंदर दिसण्याचा अट्टाहास
सुंदर आणि तरुण दिसणे प्रत्येकालाच आवडत असते, चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी लोक बोटोक्सपासून शस्त्रक्रिया देखील करवून घेत असतात. अशा स्थितीत जर कुणी अँटी-एजिंगपासून वाचण्यासाठी कुणी रक्ताचा वापर करत असेल तर ते अजब वाटते.
तरुण दिसण्यासाठी ही अनोखी पद्धत सोफिया क्लेरीसी नावाची एक इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर आणि मॉडेलने शोधून काढली आहे. इन्स्टाग्रामवर 2.2 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आणि स्वत:च्या चाहत्यांकरता आकर्षक छायाचित्रे शेअर करणाऱ्या सोफियाने अलिकडेच केलेला दावा धक्कादायक आहे. वाढत्या वयात तरुण दिसण्यासाठी मी स्वत:चे रक्त प्राशन करते असे सोफियाने सांगितले आहे.
सोफियाने स्वत:च्या डिनरचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून त्याच्या पार्श्वभागात लाल रंगाचे पेय दिसून येते. सोफियाने हे छायाचित्र अपलोड करताच तिच्या एका चाहत्याने या पेयासंबंधी विचारणा केली. यावर सोफियाने दिलेले उत्तर ऐकून लोकांना धक्काच बसला आहे. सोफियाने मग आणखी एक छायाचित्र पोस्ट केले आहे. यात ती स्वत:च्या हातानजीकचा आणखी एक ग्लास दर्शविते, ज्यावर रक्ताचे डाग दिसून येतात.
मी स्वत:चे रक्त मिळविते आणि मग यात मी लिंबाचा रस मिसळत असल्याचे सोफियाने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. सोफियाने स्वत:च्या कॉस्मेटिक्सच्या बॅगचे छायाचित्र अपलोड केले असून यात रक्ताची एक छोटी ट्यूब दिसून येत.
माझ्या रेफ्रिजरेटरमध्ये नेहमीच 9 ट्यूब रक्त असते आणि मी दर आठवड्यात 4 ट्यूब रक्त प्राशन करत असते. रक्तप्राशनाचे परिणाम चांगले असायला हवेत म्हणून त्यात लिंबाचा रस मिसळत असल्याचे तिचे सांगणे आहे. स्वत:ला चिनी मातीची बाहुली ठरविणाऱ्या सोफियाने स्वत:बद्दल चित्रविचित्र दावे केले आहेत. सोफियाची गणना इन्स्टाग्रामवरील आकर्षक व्यक्तींमध्ये होत असते.