For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

200 जणांच्या जमावाचा ईडीच्या पथकावर हल्ला

06:55 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
200 जणांच्या जमावाचा ईडीच्या पथकावर हल्ला
Advertisement

पश्चिम बंगालमधील घटनेत गाड्यांची तोडफोड : तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरावरील छाप्यावेळी तणाव

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

कोविड संसर्गादरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या रेशन घोटाळ्याप्रकरणी छापा टाकण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी तृणमूल काँग्रेस नेत्याच्या घरी पोहोचले असता गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील संदेशखळी गावात शुक्रवार, 5 जानेवारी रोजी ही घटना घडली. हल्लेखोरांनी ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. तसेच सीआरपीएच्या जवानांचा पाठलाग केला. यावेळी झालेल्या तणावात ईडीचे अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवरून आता राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Advertisement

पश्चिम बंगालमधील कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात ईडीचे पथक अनेक ठिकाणी छापे टाकण्यासाठी गेले होते. ईडीचे पथक तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. स्थानिक लोक आणि टीएमसी कार्यकर्त्यांनी ईडी अधिकारी आणि सीआयएसएफच्या जवानांवर हल्ला केला. जमावाने ईडी अधिकारी आणि सीआयएसएफच्या वाहनांनाही लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक लोकांच्या जमावाने अधिकारी आणि सीआरपीएफ जवानांना घेरले. सीआयएसएफचे जवान सुरक्षा पुरवण्यासाठी ईडी अधिकाऱ्यांसोबत होते.

कायदा-सुव्यवस्थाप्रश्नी भाजपची विचारणा

ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना, या घटनेवरून रोहिंग्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काय करू शकतात हे दिसून येते, असे भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे प्रमुख सुकांता मजुमदार म्हणाले. ईडीकडून कारवाई केली जात असलेल्या सर्वांवर भ्रष्टाचाराच्या तक्रारी आणि आरोप आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून त्यांच्यावर कारवाई होणे स्वाभाविक आहे. या हल्ल्यावरून रोहिंग्यांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची काय स्थिती झाली आहे हे स्पष्टपणे दिसून येते, असेही ते पुढे म्हणाले.

बोनगावच्या माजी सभापतांवर छापा

छाप्यांच्या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी बोनगावचे माजी सभापती शंकर आद्य यांचे सासरे आणि टीएमसी नेते बिजॉय कुमार घोष यांच्या घरावर छापे टाकण्यास सुऊवात केली. तसेच त्यांचे निकटवर्तीय अंजन माळकर आणि विश्वजित घोष यांच्या घरांवरही ईडीच्या पथकाने छापे टाकले. शंकर आद्य यांच्या भावाच्या आईस्क्रीम कारखान्यावरही छापा टाकण्यात आला आहे. तसेच गोपाल बनिक यांच्या घरावरही छापे टाकण्यास सुऊवात केली होती.

ज्योतिप्रिया मलिकही यापूर्वी टार्गेटवर

यापूर्वी रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. वनमंत्री होण्यापूर्वी ज्योतिप्रिया मलिक यांनी अन्नमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली होती. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने या कथित घोटाळ्यात तांदूळ मिल मालक बाकीबुर रहमान याला अटक केली होती. 2004 मध्ये राईस मिल मालक म्हणून करिअरची सुऊवात करणाऱ्या रहमानने पुढील दोन वर्षांत आणखी तीन कंपन्या स्थापन केल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement
Tags :

.