For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात जमावाने एकाला जिवंत जाळले

06:22 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात जमावाने एकाला जिवंत जाळले
Advertisement

धर्मग्रंथाचा अवमान करण्याचा आरोप : पोलीस स्थानकही पेटवून दिले

Advertisement

वृत्तसंस्था/ पेशावर

पाकिस्तानात संतप्त जमावाने एका इसमाला धर्मग्रंथाचा अवमान केल्याचा आरोप करत जिवंत जाळले आहे. ही घटना खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्याच्या मदयान भागात घडली आहे. स्थानिक पोलिसांनुसार या हिंसेत 8 जण जखमी झाले आहेत.

Advertisement

मारले गेलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद इस्माल होते, तो मदयान येथे पर्यटनादाखल आला होता. स्थानिक लोकांच्या तक्रारीवर पोलिसांनी त्याला अटक केली होती. परंतु धर्मग्रंथाच्या कथित अवमानाची बाब पूर्ण भागात आगीप्रमाणे फैलावली. काही तासातच संतप्त जमावाने पोलीस स्थानकावर हल्ला केला आणि संशयिताला स्वत:च्या ताब्यात घेतले. यादरम्यान जमावाने पोलीस स्थानकात तोडफोड करत आग लावली.

जमावाने मोहम्मदला जबर मारहाण करत त्याचे चित्रण केले. तो बेशुद्ध होईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर जमावातील काही जणांनी ज्वलनशील पदार्थ आणत तो इस्माइलवर ओतत त्याला पेटवून दिले. इस्माइलचा मृत्यू होईपर्यंत जमाव तेथून हटला नव्हता. जमावातील काही जणांनी याचे चित्रिकरण करत व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या घटनेनंतर पूर्ण भागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेची आम्ही दखल घेतली आहे. याप्रकरणी आम्ही सातत्याने स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आहोत. पोलिसांना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  ठोस पावले उचलण्याचा आदेश दिला असल्याचे खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :

.