For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कैद्यासाठी आणलेल्या मिठाईत घातक रसायनाचे मिश्रण

06:46 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
कैद्यासाठी आणलेल्या मिठाईत घातक रसायनाचे मिश्रण
Advertisement

हुक्केरीतील महिलेविरुद्ध पोलिसात फिर्याद

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याला भेटण्यासाठी आलेल्या महिलेने आणलेल्या मिठाईत रासायनिक पदार्थ आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पेढ्यातून विषबाधा करण्याचा प्रयत्न होता का? असा संशय बळावला आहे.

Advertisement

कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक नचिकेत जनगौडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. मिठाईतून घातपात घडविण्याचा प्रयत्न होता का? याचा तपास करण्यात येत आहे.

बडकुंद्री, ता. हुक्केरी येथील रेखा मरडी नामक महिला खून प्रकरणात कारागृहात असलेल्या काशप्पा करीकोळ या कैद्याला भेटण्यासाठी 13 मार्च रोजी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आली होती. तिने आपल्यासोबत अर्धा किलो पेढ्याचा बॉक्स आणला होता. कारागृहाच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकांकडून खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते. तपासणीत पेढ्यात रासायनिक पदार्थ आढळला आहे.

कारागृहातील कैद्यांना कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या अन्न व खाद्यपदार्थांची प्रवेशद्वारावरच तपासणी केली जाते. अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्यानंतर यंत्रोपकरणाच्या माध्यमातूनही तपासणी होते. या तपासणीत पेढ्यांमध्ये पारा सदृश रसायन आढळून आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पेढे आणलेली महिला कोठे आहे? अशी विचारणा करताच तिने तेथून पळ काढल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.