भक्ष्याकडून विष चोरणारा सागरी जीव
ब्ल्यू ड्रॅगन हा जीव सर्वसाधारणपणे हिंदी महासागर, अटलांटिक आणि प्रशांत महासागरात आढळतो. हे स्वत:पेक्षा छोट्या परंतु केवळ विषारी जीवांचे सेवन करतो. पॉर्चुगीस मेनोवार याचे भक्ष्य ठरत असतो. या जीवाची लांबी फारतर 1.2 इंच असते, हा एक प्रकारचा सागरी स्लग आहे.
या जीवाला सी स्वॅलो किंवा ब्ल्यू एंजल देखील म्हटले जाते. याच्याकडे पंखांचे तीन सेट असतात, ज्यांना सेराटा म्हटले जाते. याचमुळे हा पाहण्यास पोकेमॉनसारखा दिसतो. ब्ल्यू ड्रॅगन सर्वसाधारणपणे सागरी पृष्ठभागावर असतो, स्वत:च्या चहुबाजूला हवेचा बुडबुडा तयार करून ठेवतो, जेणेकरून लाटांच्या माऱ्यापासून स्वत:ला वाचविता येईल.
हा बुडबुडा तो स्वत:च्या पोटाद्वारे तयार करतो, याच्याच मदतीने तो सागरी पृष्ठभागावर तरंगत राहतो. समुद्रात हा जीव उलटा पोहत असतो. याचा निळा रंग याला समुद्राच्या रंगासोबत मिसळून देतो. जेणेकरून तो स्वत:ला शिकार होण्यापासून वाचवू शकेल. याच्या भक्ष्यात पॉर्चुगीस मनोवार, बाय-द-विंड-सेलर्स आणि वायलेट सी स्नेल सामील असते.
सर्वसाधारणपणे हे तिन्ही जीव अत्यंत विषारी असतात, परंतु ब्ल्यू ड्रॅगन या जीवांचे विष देखील चोरून घेतो. हा प्राणी अत्यंत विषारी असतो. परंतु याच्या विषामुळे माणसांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो. परंतु याच्या दंशामुळे तीव्र वेदना होत असतात. याचमुळे या जीवापासून दूर राहण्यातच भलं असतं.