महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मोरजीत घरावर आंब्याचे झाड कोसळले

01:25 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोरजी : मळेकरवाडा मोरजी येथील शांती शेटगावकर यांच्या राहत्या घरावर भले मोठे आंब्याचे झाड कोसळून रु. 70 हजारांची नुकसानी झाली. मोरजी तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे.आंब्याचे झाड घरावर कोसळल्याची माहिती मिळताच मोरजी पंचायतीने पुढाकार घेऊन घरावर पडलेले आंब्याचे झाड हटविले. यावेळी विद्यमान सरपंच तथा माजी सरपंच सुरेखा शेटगावकर, माजी उपसरपंच अमित शेटगावकर, सरपंच मुकेश गडेकर आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घरावर पडलेले झाड पंचायतीने पुढाकार घेऊन हटविल्याबद्दल शांती शेटगावकर यांनी धन्यवाद देऊन समाधान व्यक्त केले. या घटनेत शांते शेटगावकर यांच्या घराचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मोरजीच्या तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.  सरकारकडून ही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शांती शेटगावकर यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article