25 वर्षांपासून जहाजांवर राहिलेला इसम
समुद्रानजीक जाणे, जहाजातून समुद्रात प्रवास करणे आणि त्याच्या सौंदर्याचा आनंद घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. या कारणामुळे लोक थेट क्रूज शिप्सच्या प्रवासावर जात असतात. क्रूज शिपमध्ये वास्तव्यापासून लोकांच्या मनोरंजनाची व्यवस्था असते. परंतु दीर्घकाळापर्यंत शिपवर राहणे अनेक लोकांसाठी अवघड ठरते. एका इसमासोबत असेच घडले आहे. हा इसम 25 वर्षांपासून जहाजातून प्रवास करत आहे. यामुळे जमिनीवर चालणेच तो विसरून गेला आहे. यामुळे चालताना तो अडखळू लागतो. मारियो सॅलसीडो हा क्यूबातील व्यापारी असून मागील 25 वर्षांपासून जहाज हेच त्याचे घर आहे. मारियो बहुतांश काळ क्रूजवरच घालवत असतो. व्रुजच्या जगतात त्याला सुपर मारियो म्हटले जाते. अलिकडेच त्याने स्वत:चा 1000 वा क्रूज प्रवास केला आहे.
अलिकडेच त्याने रॉयल कॅरिबियन व्रुजमधून 5 जानेवारी रोजी मियामी येथुन प्रवास सुरू केला आणि पनामा-साउथ कॅरिबियनपर्यंत प्रवास केला. हा प्रवास 11 रात्रींचा होता. दरवर्षी मी सुमारे 88 लाख रुपये क्रूजवर खर्च करतो आणि तेथूनच माझे काम करतो. दिवसा मी सुमारे 5 तास काम करतो आणि उर्वरित वेळेत आराम करतो असे मारियोने सांगितले.
मारियोच्या या कंडिशनला मैल डे डीबार्कमेंट सिंड्रोम म्हणतात. या कंडिशनमध्ये माणूस जर थांबलेला असला तरीही त्याला आपण सदैव चालत आहोत असे वाटत असल्याची माहिती द फॅमिली क्रूज कंपॅनियनचे संस्थापक आणि सीईओ एलेन वॉरेन यांनी दिली.
क्रूज शिपवर अधिक वेळ घालविल्याने शरीर देखील त्यानुसार बदलू लागते. लोकांना शिपच्या हलण्याची सवय होते आणि शरीर त्यानुसार बदलत असते. मग कठोर जमिनीवर चालणे अवघड वाटू लागते. या कंडिशनला सी लेग्स म्हटले जाते. या सिंड्रोमने ग्रस्त लोक नीट चालू शकत नाहीत. त्यांचे पाय अडखळू लागतात, ही कंडिशन सर्वसाधारणपणे 24 तासांमध्ये संपते. परंतु अनेकदा याकरता महिने अन् वर्षेही लागू शकतात. मी 1997 पासून क्रूजवर प्रवास करत आहे. महामारीमुळे 2020 मध्ये 15 महिन्यांसाठी जमिनीवर रहायला आलो होतो आणि मग पुन्हा क्रूजवर परतलो असे मारिया यांनी सांगितले.