रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक
06:22 AM Dec 14, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव
Advertisement
: बेळगावमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीकडून 45 हजार 242 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Advertisement
महिन्याभरापूर्वी बेळगावमध्ये तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळीही एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली होती. दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार 242 रुपयांची एकूण 22 रेल्वे तिकिटे हस्तगत केली. तसेच 15 हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरणही जप्त करण्यात आले आहे. संबंधितावर रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
Next Article