महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुपवाडात घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळला

06:43 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमकीत जवानही हुतात्मा

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनग

Advertisement

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे शनिवारी पुन्हा एकदा दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली. कळमकरी भागात ही चकमक झाली. या संघर्षात एका मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह 5 जवान जखमी झाले असून त्यापैकी 1 जवान हुतात्मा झाला आहे. या चकमकीबाबत लष्कराकडून एक वक्तव्य आले आहे. त्यात नियंत्रण रेषेवरील मच्छल सेक्टरमधील कामकरी येथे एका फॉरवर्ड पोस्टवर अज्ञात जवानांनी गोळीबार केला. यावेळी झालेल्या संघर्षात एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पाकिस्तानी लष्कराची बॉर्डर अॅक्शन टीम दहशतवाद्यांच्या एका गटाला भारतीय हद्दीत घुसण्यास मदत करत होती. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांचा दहशतवाद्यांशी सामना झाला. यामध्ये लष्कराचे काही जवान जखमी झाले. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भारतीय जवानांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताच काही दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू-काश्मीरच्या कोणत्या ना कोणत्या जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कराने अलीकडेच एलओसीवर घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले होते.

तीन दिवसांत दुसरी चकमक

कुपवाडा येथे गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी चकमक आहे. कुमकारी भागात दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान ही चकमक झाली. संभाव्य दहशतवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कुमकारी भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती. आज सुरक्षा दलांना येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी (23 जुलै) कुपवाडा येथेही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. तर तिथे सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article