महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

छत्तीसगडमधील बंगाली समुदायावर नजर

05:45 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी केला भाजपचा प्रचार

Advertisement

पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांनी रामानुजगंज येथे भाजप उमेदवार रामविचार नेताम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आहे. यावेळी ठाकूर यांनी बंगाली मतुआ समुदायाच्या लोकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेवर आल्यास केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ येथील लोकांना मिळणार असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. रामानुजगंज मतदारसंघात बंगाली समुदायाच्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. या मतदारसंघात बंगाली समुदायाची निर्णायक भूमिका आहे. याचमुळे भाजपने बंगाली मतुआ समुदायाला स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसदरम्यान अत्यंत चुरशीची लढत आहे. शांतनू ठाकूर हे बंगाली समुदायाच्या मतदारांदरम्यान प्रभावशाली सामाजिक धार्मिक संप्रदाय ठाकुरबाडीचे उत्तराधिकारी आहेत. मतुआ समुदायातील ते सर्वात प्रभावशाली नेते आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article