महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निळ्या जीभेमुळे ओळखला जाणार सरडा

06:27 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाळता येण्यासारखा सरडा

Advertisement

जगात अनेक प्राणी आकार किंवा स्वत:च्या अजब रंगामुळे ओळखले जातात. असाच एक प्राणी निळ्या  जीभेसाठी ओळखला जातो. हा एक प्रकारचा सरडा असून त्याचा दोन फुटांचा आकार त्याला वेगळी ओळख मिळवून देतो. परंतु हा स्वत:च्या खास आणि वेगळ्या प्रकारच्या निळ्या रंगाच्या जिभेमुळे  अधिक ओळखला जातो. या जीभेचे अनेक उपयोग देखील होत असतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सरड्याला पाळता येते.

Advertisement

स्किंक सरड्याच्या पाय सर्वसामान्य सरड्यापेक्षा छोटे आणि मान कमी लवचिकत असते. निळ्या जिभेच्या स्किंकचे वय सुमारे 30 वर्षांपर्यंत असते. त्यांची लांबी सुमारे 2 फूटांपर्यंत आणि वजन अर्ध्या किलोग्रॅमपर्यत असते. सरड्याचे शरीर तसे पिवळ्या, लाल रंगाचे असते. परंतु त्याचे तोंड पाहिल्यावर तुम्हाला तो साप वाटू शकतो.

स्किंकची निळ्या रंगाची जीभ प्रकाशाला परावर्तित करू शकते. जो प्राणी अशा किरणांना पाहतो त्याच्यासाठी या स्किंकची जीभ अत्यंत चमकदार वाटू शकते. हाच गुण स्किंकला अन्य शिकारींपासून वाचवत असते. निळ्या रंगाच्या जिभेद्वारे स्किंक स्वत:च्या परिवारातील अन्य सरड्यांदरम्यान दीर्घ अंतराचा संचारही करू शकतो. याचे कारण म्हणजे या जिभेला दूरवरून पाहणे सोपे आहे, सर्वात चमकदार जीभ असलेल्या स्किंकला याचे अनेक लाभ आहेत. यामुळे त्याचे रक्षण देखील होत असते.

झुडुपयुक्त भागात राहणाऱ्या निळ्या जिभेचा स्किंक ऑस्ट्रेलिया, न्यू गयाना आणि इंडोनेशियात अधिक आढळून येतात. फळे, फुलांसोबत हा सरडा अनेक प्रकारचे पक्षी आणि प्राणीही फस्त करत अतसो. परंतु हा लपूनच शिकार करतो आणि तो फारचा चपळ नसतो. अत्यंत मंद गतीने चालण्यासाठी त्याला ओळखले जतो. शहरी वातावरणात हा सरडा सहजपणे सामावून घेतो. निळ्या जिभेच्या स्किंकचे वैशिष्ट्या म्हणजे तो साथीदार निवडताना अत्यंत खबरदारी बाळगत असतो. नर नेहमी एकाच मादीसोबत राहतो. हा या प्राण्याबाबतचा चकित करणारा गुण आहे.

निळ्या जिभेचा स्किंक पाळला जाऊ शकतो तसेच तो शहरी वातावरणात राहू शकतो. त्याची देखभाल सोपी आणि स्वस्त आहे. त्यांना हाताने भरणे सोपे असते. अनेकदा हा सरडा बोटांना अन्न समजूनच चावत असतो. अशा स्थितीत काळजी घ्यावी लागत असते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article