For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हायटेक रेल्वेस्थानकामध्ये गळती

09:57 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
हायटेक रेल्वेस्थानकामध्ये गळती
Advertisement

दुसऱ्याच वर्षी गळती लागल्याने नाराजी

Advertisement

बेळगाव : दोन वर्षांपूर्वीच बांधकाम केलेल्या बेळगाव रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीला गळती लागली आहे. छतावरील पाणी थेट रिझर्व्हेशन काऊंटरवर तिकीट काढणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडत आहे. त्यामुळे हायटेक रेल्वेस्थानक बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव रेल्वेस्थानकाची ब्रिटिशकालीन इमारत हटवून त्याजागी हायटेक रेल्वेस्थानक उभे करण्यात आले. 2022 मध्ये रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन झाले.परंतु उद्घाटन होऊन दोन वर्षे होत नाहीत तोवर रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीमध्ये गळती लागली आहे.मागील चार दिवसांत बेळगावमध्ये झालेल्या धुवाधार पावसाने रेल्वेस्थानकाच्या छतावरील पाणी भिंतीवरून थेट रिझर्व्हेशन काऊंटरवर आले. काऊंटरवर तिकीट काढणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी पडत होते. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. हायटेक रेल्वेस्थानकाच्या इमारतीत गळती लागतेच कशी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रेल्वेस्थानकाला गळती लागल्याने काहींनी याची तक्रार रेल्वे मंत्रालयाकडे करण्याची तयारी सुरू केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.