For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बुध ग्रहावर मिळाला खजिना हिऱ्यांचे मोठे आवरण

06:05 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
बुध ग्रहावर मिळाला खजिना हिऱ्यांचे मोठे आवरण
Advertisement

बुध ग्रहावर 9 मैल रुंद म्हणजेच 14.48 किलोमीटर रुंदीचे हिऱ्याचे आच्छादन मिळाले आहे. हे आच्छादन ग्रहाच्या पृष्ठभागाखाली आहे. याचा खुलासा अलिकडेच नेचर कम्युनिकेशन्स नियतकालिकात प्रकाशित अहवालातून झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील हिऱ्यांना पृथ्वीवर आणता येणार नाही, परंतु याचे अध्ययन करून बुध ग्रह निर्मिती आणि त्याच्या मॅग्नेटिक फील्डची माहिती प्राप्त करता येणार आहे.

Advertisement

बुध ग्रह अनेक प्रकारच्या रहस्यांना स्वत:मध्ये सामावून आहे. सर्वात मोठे रहस्य त्याचे मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच चुंबकीय क्षेत्र आहे. या ग्रहाचे मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीच्या तुलनेत अत्यंत कमकुवत आहे. कारण हा ग्रह अत्यंत छोटा आहे. भौगोकि स्वरुपात सक्रीय देखील नाही. याचा पृष्ठभाग अनेक ठिकाणी दाट रंगाचा आहे.

नासाच्या मेसेंजर मिशनने पृष्ठभागावर असलेल्या दाट रंगांची ग्रॅफाइट म्हणून ओळख पटविली होती. हा कार्बनचा एक फॉर्म आहे. बीजिंगच्या सेंटर फॉर हाय प्रेशर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अॅडव्हान्स रिसर्चमध्ये वैज्ञानिक असलेले यानहाओ ली यांनी बुध ग्रहाच्या रहस्यांचा खुलासा याच्यातील आच्छादने आणि रचनेच्या अध्ययनातून होणार आहे.

Advertisement

हा ग्रह अन्य ग्रहांप्रमाणेच निर्माण झाल्याचे आमचे मानणे आहे. म्हणजेच तप्त मॅग्मा वितळल्यावर ग्रहाची निर्मिती झाली असावी. परंतु बुध ग्रहात हा मॅग्मा समुद्रातील  कार्बन आणि सिलिकेटने भरपूर राहिला असेल. तेव्हाच एवढ्या प्रमाणात तेथे हिरे आहेत. ग्रहाच्या आतील केंद्र मजबूत धातूंने निर्माण झाले असावे असे यानहाओ ली यांनी म्हटले आहे.

2019 मध्ये समोर आलेल्या एका अध्ययनात बुध ग्रहाचा मैंटल कल्पनेपेक्षाही 50 किलोमीटर खोलवर असल्याचे म्हटले गेले होते. म्हणजेच याच्या कोअर अणि मैंटलदरम्यान अत्यंत अधिक प्रेशर निर्माण होत असेल. याचमुळे ग्रहाच्या आत असलेले कार्बन हिऱ्यात रुपांतरित होत राहिले असावे, याचमुळे तेथे हिऱ्यांचे मोठे आच्छादन मिळाल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.