For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दगडांची दफनभूमी नाव असणारे सरोवर

07:00 AM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
दगडांची दफनभूमी नाव असणारे सरोवर
Advertisement

नजीक जाण्यासही घाबरतात लोक

Advertisement

आफ्रिका खंडात एक असे सरोवर आहे, जे स्वत:च्या सौंदर्याने आकर्षित करते, परंतु स्पर्श करणाऱ्याचा मृत्यू घडवून आणते. नाट्रॉन सरोवर टांझानियाच्या उत्तर क्षेत्रात ओल डोइन्यो लेंगाई ज्वालामुखीनजीक असून त्याला ‘दगडांची दफनभूमी’ म्हटले जाते. याचे लाल रंग रक्तासारखे चमकदार पाणी पाहून पर्यटक मोहित होतात, परंतु याच्या मागे दडलेले सत्य इतके भयावह आहे की, माणसाच्या अंगावर काटा येतो. हा सरोवर केवळ प्राण्यांनाच नव्हे तर माणसांनाही दगडात रुपांतरित करू शकतो अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. प्रत्यक्षात नाट्रॉन सरोवराचा पीएच स्तर 10.5 पर्यंत पोहोचतो. हा स्तर सामान्य पाण्यापेक्षा खूपच अधिक क्षारयुक्त आहे.

यात सोडियम कार्बोनेट आणि बायकार्बोनेटचे प्रमाण अधिक असते, ज्याला सोडा ऐश देखील म्हटले जाते. हे रसायन इतके कास्टिक (जळजळ निर्माण करणारे) आहे की, जर कुणी अनुकूलित जीव यात कोसळला तर त्याची त्वचा आणि डोळे होरपळू शकतात. ब्रिटिश फोटोग्राफर निक ब्रँड्ट यांनी 2013 मध्ये येथील छायाचित्रे टिपली होती. ज्यात मृत पक्ष्यांचे शरीर दगडाच्या मूर्तीसारख्या मुद्रेत उभे दिसून आले होते. तेव्हापासूनच या अफवांना आधार मिळाला होता. या छायाचित्रांनी जगभरात खळबळ उडवून दिली. परंतु विज्ञानाच्या नजरेतून ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून याला कॅल्सिफिकेशन म्हटले जाते. जेव्हा एखादा प्राणी मरतो आणि त्याचे शरीर सरोवरात बुडते, तेव्हा क्षारयुक्त पाणी त्याच्या पेशींना कठोर करते, हाडांना अत्यंत मजबूत करतात आणि ममीकरणासारखा प्रभाव निर्माण करतात. परिणामादाखल मृतदेह सडत नाही, तर दगडासारख्या संरचनेत बदलून जातात.

Advertisement

एका पक्ष्यासाठी स्वर्ग

परंतु हे सरोवर पूर्णपणे घातक नाही, प्रत्यक्षात हे लेसर फ्लेमिंगो पक्ष्यांचे प्रमुख प्रजननस्थळ आहे. लाखो फ्लेमिंगो दरवर्षी येथे अंडी घालतात, कारण हे विषारी पाण्याप्रति अनुकूलित आहेत. त्यांच्या पायांची त्वचा जाड असते, जी जळजळ होण्यापासून त्यांना वाचविते, परंतु अन्य पक्षी चुकून सरोवरात पडल्यास त्याचा जीव धोक्यात सापडतो.

Advertisement
Tags :

.