महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कदंब बसखाली झोकून देत मजुराची आत्महत्या

12:22 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोरजी मुनांगवाडा येथील घटना

Advertisement

पेडणे : मोरजी पंचायत क्षेत्रातील मुनांगवाडा येथे रविवारी दि. 7 रोजी सकाळी 8.15 वाजता मुख्य रस्त्यावर कदंब बसच्या चाकाखाली झोकून देत एका मजुराने आत्महत्या केली. बिन तिरकी (28) मूळ झारखंड असे मजूराचे नाव आहे. कदंबची बस क्रमांक जीए-03-एस-0514 ही मांद्रेहून मोरजीमार्गे पणजीला जात होती. मुनांगवाडा येथील मुख्य रस्त्यावर प्रवाशांना घेण्यासाठी कदंब बस चालकाने या ठिकाणी बस थांबवली. बस पुन्हा सुरू होत असताना एका मजुराने चाका खाली झोकून दिलयाने त्याचा चिरडून मृत्यू झाला. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.प्रथमदर्शनी ही व्यक्ती गाडीच्या चाकाखाली सापडून अपघात झाल्याचे वाटत होते.  मात्र मोरजी पंचायतीने बसवलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवरून हा अपघात नसून ही व्यक्ती बसखाली उडी घेताना स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या मजुराने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, बस चालकाची काही चूक नाही. बस चालू करत असताना त्याने खाली उडी घेतली व तो चाकाखाली चिरडून ठार झाला, असे तेथे उपस्थित असलेल्या काही मजूर महिलांनी सांगितले. पेडणे पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. तत्पूर्वी मृतदेह बांबोळीला गोमेकॉत पाठविला. निरीक्षक सचिन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article