For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्षुल्लक कारणावरून युवकावर चाकूहल्ला

10:56 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्षुल्लक कारणावरून युवकावर चाकूहल्ला
Advertisement

आई-भावजयीला अटक, मोठा भाऊ फरारी

Advertisement

बेळगाव : क्षुल्लक कारणावरून एका युवकावर चाकूहल्ला झाला आहे. बुधवारी मध्यरात्री राजारामनगर, उद्यमबाग येथे ही घटना घडली असून मोठ्या भावाने लहान भावावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. जखमीचा मोठा भाऊ फरारी झाला आहे. धर्मेंद्र मल्लाप्पा द्यामगोळ (वय 30, रा. राजारामनगर उद्यमबाग) असे चाकू हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. त्याला बुधवारी मध्यरात्री उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी धर्मेंद्रची पत्नी सुधा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धर्मेंद्रचा भाऊ संजू मल्लाप्पा द्यामगोळ, त्याची पत्नी संगीता संजू द्यामगोळ व आई बसव्वा मल्लाप्पा द्यामगोळ या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. संगीता व बसव्वा यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्र व त्यांचे कुटुंबीय आपल्या घरात बोलत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे. धर्मेंद्रचा भाऊ संजू, त्याची पत्नी व आई परसात येऊन आमची वीज कनेक्शन का तोडलास? अशी विचारणा केली. आपण कनेक्शन तोडले नसल्याचे धर्मेंद्रने सांगितले. त्याचवेळी त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक दिलीपकुमार सागर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.