महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कर्मयोगी अखंड आनंदात असतो

06:36 AM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

कर्मयोगाची सुरवात कोणतीही अपेक्षा न बाळगता कर्म करायचं आहे या विचारसरणीतून होते. कर्मयोग आचरायला सुरवात केल्यावर मनुष्यात हळूहळू बदल होऊ लागतो. हा बदल मोक्ष मिळण्याच्या दृष्टीने अनुकूल असतो. हळूहळू निरपेक्षतेनं कर्म करणं हा माणसाचा स्वभाव बनून जातो. मनुष्य जेव्हा असं निरपेक्षतेनं कार्य करू लागतो तेव्हा त्याला मिळणारा आनंद कधीही न संपणारा असतो.

Advertisement

असा न संपणारा आनंद निरपेक्षतेनं कर्म करणाऱ्या व्यक्तीला का मिळतो ते बाप्पा सध्या आपण अभ्यासत असलेल्या निर्मलो यतचित्तात्मा जितखो योगतत्पर ।  आत्मानं सर्वभूतस्थं पश्यन्कुर्वन्न लिप्यते ।।7 ।। ह्या श्लोकात सांगत आहेत.

ते म्हणतात, असा स्वभावत: निरपेक्ष कर्म करणाऱ्या मनुष्याने कर्मयोग घोटून घोटून गिरवलेला असल्याने तो मनाने निर्मळ असतो. स्वत:च्या बुद्धीवर त्याचा ताबा असतो. त्यानं इंद्रियांवर जय मिळवलेला असतो. हे सर्व साध्य केलेलं असल्याने त्याला अक्षय्य आनंदाची प्राप्ती झालेली असते. हा चमत्कार निरपेक्षतेनं करत असलेल्या कर्मातून साधलेला असतो. त्याला सर्वांच्यात आपल्यासारखाच ईश्वरी अंश असलेला आत्मा आहे याची जाणीव झालेली असते. त्यामुळे विश्वबंधुत्वाची कल्पना त्याच्या मनात दृढ झालेली असते. विश्वातील सर्वजण त्याला स्वत:च्या कुटुंबातील सदस्य वाटत असतात.

आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी काही केलं तर त्यातून परतफेडीची अपेक्षा कसली करायची या विचारामुळे त्याला कुणाकडूनही काहीही अपेक्षा नसते. त्यामुळे केलेल्या कर्माचे विचार कर्म करून झाल्याक्षणीच त्याच्या मनातून नाहीसे होतात. त्याच्या निरपेक्ष स्वभावामुळे त्याने केलेल्या कर्मातून पापपुण्याची निर्मिती होत नाही. त्यामुळे कर्म करूनसुद्धा तो त्यापासून अलिप्त असतो. माणसाचा पुनर्जन्म त्याने साठवलेल्या पापपुण्याचा भोग घेण्यासाठी तसेच त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी होत असतो परंतु निरपेक्ष व्यक्तीच्या कोणत्याही इच्छा अपुऱ्या राहिलेल्या नसतात तसेच त्याच्याकडे पापपुण्याचा साठाही नसतो म्हणून त्याचा पुनर्जन्म होत नाही.

पुढील श्लोकात बाप्पा असे म्हणतात की, अखंड आनंदात असलेल्या कर्मयोग्याला वाट्याला आलेलं कर्म करायचं एव्हढंच त्याला माहित असतं. त्यामुळे त्याला अकर्म म्हणजे काय याचीही कल्पना असते. तो स्वत:ला अकर्ता समजत असतो.

तत्त्वविद्योगयुक्तात्मा करोमीति न मन्यते ।

एकादशानीन्द्रियाणि कुर्वन्ति कर्मसंख्यया ।। 8 ।।

अर्थ- तत्त्ववेत्ता आणि योगाचे ठिकाणी मन युक्त असलेला योगी ‘मी कर्म करतो’ असे मानत नाही. एकादश इंद्रिये संख्येने तितकीच म्हणजे एकादश कर्मे करतात असे तो जाणतो.

विवरण- कर्मयोग मनापासून अचरणाऱ्याला कर्मयोगाचे निरपेक्षतेनं कर्म करण्याचे तत्व समजलेले असतं. त्यामुळे याप्रमाणे वागत गेल्यास शेवटी मोक्ष मिळतो हेही तो जाणून असतो. बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे योग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन ही खूणगाठ त्यानं मनाशी बांधलेली असते.

आता त्याचं ध्येय एकच असतं ते म्हणजे ईश्वराने दिलेलं काम निरपेक्षतेनं करणे. ध्येय निश्चित असल्याने तो त्यात स्वत:चं काहीही डोकं लावत नाही. त्याचा परिणाम म्हणून करत असलेल्या कामात तो स्वत:च्या मनाने भर घालून अकर्म म्हणजे वाट्याला आलेल्या कामापेक्षा वेगळं कर्म करत नाही. इतर कोणत्याही कामाचा विचार डोक्यात नसल्याने त्याची इंद्रिये एकावेळी एकच काम एकाग्रतेने करत असतात. असं करत असताना हे कर्म ईश्वरांचं असून तेच माझ्याकडून ते करून घेत आहेत ही जाणीव मनात पक्की असल्याने तो स्वत:ला अकर्ता समजत असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article