For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेंग्विनसोबत राहण्याचा जॉब

07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेंग्विनसोबत राहण्याचा जॉब
Advertisement

जगात अशा अनेक जागा आहेत, जेथे माणूस सहजपणे वास्तव्य करू शकत नाही. अशाच जागांमध्ये अंटार्क्टिकाचाही समावेश होतो. कुठल्याही प्रकारच्या सुविधा तेथे मिळणे दुरापास्त आहे. याचदरम्यान तेथे एक जॉब निघाला आहे. याकरता निवडण्यात आलेल्या इसमाला पेंग्विन्सच्या सान्निध्यात रहावे लागेल. ही नोकरी अंटार्क्टिकाच्या प्रसिद्ध पेंग्विन पोस्ट ऑफिसमध्ये असेल. ही नोकरी करणाऱ्या इसमाला आठवड्यात केवळ दोनदाच स्नान करता येणार आहे. दरवर्षी अंटार्क्टिका हेरिटेज ट्रस्टमध्ये नोकऱ्यांसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढते. यंदा तीन पदांकरता भरती होणार असून केवळ ब्रिटनचे नागरिकच याकरता अर्ज करू शकणार आहेत. दरवर्षी 80 हजार पत्रं आणि पोस्टकार्ड्सना हाताळण्यासोबत कर्मचाऱ्यांना शॉपवरही काम करावे लागेल. तेथे येणाऱ्या सुमारे 18 हजार क्रूझ प्रवाशांचे स्वागतही करावे लागेल. मँचेस्टरमध्ये चॅरिटी मॅनेजरचे काम करणाऱ्या केटी शॉने याकरता अर्ज केला. तिने टॅटूही काढून घेतले आहेत. एका पायावर अंटार्क्टिकाचा नकाशा आणि दुसऱ्या पायावर संशोधक अर्नेस्ट शेकल्टन यांचे चित्र आहे. बालपणापासूनच मला अंटार्क्टिकात सागरीजीव शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची इच्छा होती. मी याचे शिक्षण घेऊ शकले नाही, हा खंड पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे केटी सांगते. कर्मचाऱ्यांना पोस्टकार्ड्सची छाननी, तिकीट विक्री, इमारतींची देखभाल करणे आणि गिफ्ट शॉप चालविण्याचे काम करावे लागेल. तसेच त्यांना पेंग्विन्सच्या सान्निध्यात रहावे लागणार आहे. येथे येणाऱ्या जहाजांच्या पॅनमधून पाणी प्राप्त करावे लागेल. परंतु तरीही कर्मचाऱ्यांना साफसफाईची काळजी घ्यावी लागणार आहे. जहाजावर जात आठवड्यात केवळ एकदाच स्नान करता येणार आहे. हवामान अधिक खराब असल्यास दोन आठवड्यात एकदाच स्नान करता येईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.