आकाशगंगेपासून दूर जातोय हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट
447 किमी प्रतिसेकंद इतका अफाट वेग
आमच्या आकाशगंगेमध्ये एक अशी वेगवान वस्तू दिसून आली आहे, जी अत्यंत फास्ट अँड फ्यूरियस आहे. हे धूसर सारखे दिसणारे ऑब्जेक्ट दर सेकंदाला 447 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापत आहे. म्हणजेच नोएडा ते लखनौपर्यंत पोहोचण्यास याला दीड सेकंदापेक्षाही कमी वेळ लागणार आहे. हे एक हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट असून ज्याला नासाच्या सिटिजन सायंटिस्टने शोधले आहे.
हे हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट आमच्या आकाशगंगेला सोडून अंतराळाच्या अन्य जगतात जात आहे. नासाचा बॅकयार्ड वर्ल्ड्स : प्लॅनेट 9 नावाचा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत विज्ञानाच्या जगताशी जोडले जाऊ इच्छिणारे लोक नासाशी जोडले जातात, अंतराळात नवनव्या गोष्टींचा शोध घेतात. बॅकयार्ड वर्ल्ड्समध्ये नासाच्या वाइस मिशनच्या छायाचित्रांचे अध्ययन केले जाते. यातून पूर्ण अंतराळात 2009-11 पर्यंतचा इन्फ्रारेड नकाशा तयार करण्यात आला आहे. या मिशनला पुन्हा नियोवाइस नावाने सुरू करण्यात आले आहे. ही मिशन 8 ऑगस्ट रोजी निवृत्त घोषित करण्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी बॅकयार्ड वर्ल्ड्सच्या सिटिजन सायंटिस्ट मार्टिन काबातनिक, थॉमस पी. बिकल आणि डॅन केसेलडेन यांनी या वेगाने पळणाऱ्या वस्तूचा शोध लावला होता. याचे नाव सीवाइज जे12409.08प्लस362116.0 ठेवण्यात आले. यानंतर यासंबंधी पृथ्वीवर असलेल्या टेलिस्कोपवरून अध्ययन सुरू करण्यात आले.
हायपरवेलोसिटी ऑब्जेक्टचा जेव्हा शोध लागला, तेव्हा आमची उत्सुकता वेगळ्या पातळीवर होती. हे ऑब्जेक्ट आमच्या आकाशगंगेला सोडून जात आहे. याचे मास अत्यंत कमी आहे, याच्या कोरमध्ये हायड्रोजन देखील नाही. यामुळे याला ब्राउन ड्वार्क देखील म्हणता येणार नाही. हा गॅस जायंट प्लॅनेट आणि ताऱ्यामधील काहीतरी असल्याचे काबातनिक यांनी म्हटले आहे.
बॅकयार्ड प्रोजेक्टच्या 9 स्वयंसेवकांनी मिळून 4 हजारांहून अधिक ब्राउन ड्वार्फ शोधले होते. परंतु कुठलाही ब्राउन ड्वार्फ आकाशगंगा सोडून जात नसल्याचे स्पष्ट झाले. यात अन्य ड्वार्फ्स आणि ताऱ्यांच्या तुलनेत कमी लोह आहे. हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट आमच्या आकाशगंगेच्या पहिल्या पिढीच्या ताऱ्यांच्या काळातील असे वाटते. याचा वेग विचारात घेतला तर एखाद्या सुपरनोव्हाच्या स्फोटानंतर निघालेला हा व्हाइट ड्वार्फ असू शकतो, जो सुपरनोव्हामधून अत्यंत अधिक पदार्थ घेऊन बाहेर पडला असावा. किंवा दुसऱ्या थिअरीनुसार हा ग्लोब्लुलर क्लस्टरमधून निर्माण झालेला असू शकतो. आता हा अन्य कृष्णविवराच्या दिशेने खेचला जात आहे, ज्यामुळे याला अधिक वेग मिळत आहे.