महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डोंगरमाथ्यावर झोपडी, झोपडीत हॉटेल

06:22 AM Jul 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगात अनेक देशांमध्ये अत्यंत दुर्गम अशा स्थानी हॉटेले काढण्याची प्रथा फार जुन्या काळापासून आहे. याचे अलिकडे कोणाला फारसे आश्चर्य वाटत नाही. काही हौशी लोक अनेक प्रकारचे कष्ट सोसून अशा दुर्गम स्थानी पोहचतात आणि तेथील हॉटेलांमधील खाद्यपेयांचा आनंद लुटतात. अशा दुर्गम स्थानी ग्राहकांची संख्या कमी असल्याने एकांत निसर्गसान्निध्य आणि मन:शांती लाभते असे अनेकांचे म्हणणे असते. त्यामुळे ते अशी अडचणीच्या जागांवरची हॉटेले मुद्दाम शोधतात. असेच एक हॉटेल इटली या देशात असून त्याचे वैशिष्ट्या असे की ते युरोपातील सर्वात उंचीवर असणारे हॉटेल आहे. ते मार्गारिटा हट या नावाने ओळखले जाते. ते समुदसपाटीपासून 15 हजार फूट उंचीवर आहे.

Advertisement

वास्तविक ही एक झोपडी आहे. नंतर तिचे हॉटेलात रुपांतर करण्यात आले आहे. या हॉटेलात पोहचणे सोपे नाही. हिमाच्छादित पर्वत त्यासाठी चढावा लागतो. तो चढण्यासाठी दोऱ्या बांधलेल्या आहेत. त्यांना धरुन जवळपास पर्वत चढल्यानंतर या हॉटेलात जाता येते. यासाठी साधारणत: पाच तास लागतात. कुशल गिर्यारोहकच हे काम करु शकतात. तरीही या हॉटेलात गर्दी असतेच. कारण काहीतरी जगावेगळे केल्याचा अनुभव अनेकांना घ्यायचा असतो. त्यामुळे हे या हॉटेलात जातात. येथे खाणेपिणेही चवदार मिळत असल्याने अशा हौशी लोकांचे प्रयत्न वाया जात नाहीत. त्यांना जे हवे ते या हॉटेलात मिळत असते. त्यामुळे अत्यंत दुर्गम स्थानी असूनही या हॉटेलची लोकप्रियता बरीच मोठी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article