For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एका पतीची होतेय जगभरात चर्चा

06:44 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
एका पतीची होतेय जगभरात चर्चा
Advertisement

लंडनमध्ये पूर्ण शहरात चिकटविली पोस्टर्स

Advertisement

लंडनमध्ये एका महिलेला काही लोकांनी भाल्याने वार करत जखमी केले होते. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु अनेक दिवसांनंतरही याप्रकरणी गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाहीत. यानंतर महिलेच्या पतीने उचललेल्या पावलाची जगभरात चर्चा होत आहे. पतीने हल्लेखोरांना शोधण्यासाठी पूर्ण शहराला पोस्टर्सनी भरून टाकले आहे. या पोस्टरवरील मजकुरामुळे पोलीस अडचणीत आले आहेत.

14 मार्च रोजी शोरेडिचच्या चौकात नाजरीन कैजली नावाच्या महिलेच्या डोक्यावर कुणीतरी भाल्याने हल्ला केला होता. या भाल्याचे टोक अद्याप या महिलेच्या कवटीत अडकलेले आहे. यानंतर 10 दिवसांनी संबंधित परिसरात हल्लेखोरांनी आणखी एका व्यक्तीवर हल्ला केला होता.

Advertisement

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु अद्याप काहीच हाती लागलेले नाही. पोलिसांना हल्लेखोरांचा शोध घेता आलेला नाही. यानंतर नाजरीनचा पती क्लिफ्टनने अनोखे अभियान सुरू केले, त्याने हाताने लिहिलेली अनेक पोस्टर्स तयार केली आणि ती पूर्ण भागात चिकटविली आहेत. कामावरून घरी परतणाऱ्या माझ्या पत्नीवर काही लोकांनी हल्ला केला. हे हल्लेखोर कोण होते हे मला माहित नाही. परंतु हा हल्ला कटांतर्गत करण्यात आला होता. सुदैवाने माझी पत्नी या हल्ल्यातून वाचली आहे, परंतु माझ्या पत्नीच्या जागी अन्य कुणी असू शकले असते. कृपया या हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची मदत करा असे पोस्टर्सवर नमूद आहे.

पोलिसांनी आम्हाला मदत करण्याऐवजी शहरातील सर्व पोस्टर्स हटविण्यास सांगितल्याचा दावा क्लिफ्टन यांनी केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तपासाचे नेतृत्व सीआयडी करत आहे. सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे. फॉरेन्सिक तपासणी होत असून लवकरच आम्ही हल्लेखोरांपर्यंत पोहोचू असा दावा पोलीस अधीक्षक जेम्स कॉनवे यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.