छोट्या गावासमोर विशाल हिमखंड
टायटॅनिक चित्रपटात जहाज एका मोठ्या हिमखंडाला धडकून बुडत असल्याचे दृश्य आहे. जर असाच हिमखंड तुमच्या घराबाहेर आल्यास काय घडेल याचा विचार करा. ग्रीनलँडच्या लोकांना ही भीती सतावत आहे, त्यांच्या घराबाहेर एक अत्यंत विशाल हिमखंड दाखल झाला आहे. पृथ्वीच्या उत्तर टोकावर वसलेल्या ग्रीनलँडमध्ये इनारसुइट नावाचे ठिकाण असून ते सध्या असाधारण नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे. येथील लोकांच्या घरानजीक एक विशाल हिमखंड वाहून आला असून आता हळूहळू किनाऱ्यानजीक सरकत आहे. हा बर्फाचा तुकडा आकारात विशाल असल्याने प्रशासन आणि रहिवाशांची झोप उडाली आहे.
हिमखंड काही दिवसांमध्ये पुढे सरकतात, असे अनेकदा दिसून आले आहे, परंतु यावेळी स्थिती वेगळी आहे. स्थानिक कर्मचारी डेनिस लेहटोनन यांच्यानुसार हा हिमखंड मागील एक आठवड्यापासून स्थिर आहे आणि हेच चिंतेचे मोठे कारण आहे. या विशाल हिमखंडामुळे काही लोक भयभीत आहेत, तर काही लोकांमध्ये यावरून उत्साहही दिसून येत आहे. इनारसुइटला अशाप्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्याची ही पहिली वेळ नाही. 2018 मध्ये देखील एक विशाल हिमखंड याच बंदरात वाहून आला होता, त्याचे वजन सुमारे 11 टन होते आणि तो अंतराळातूनही दिसून येत होता. हा हिमखंड जोरदार वाऱ्यांमुळे हळूहळू वाहत गेल्याने नुकसान टळले होते. यावेळीही जोरदार वारे किंवा सागरी प्रवाह या हिमखंडाला दुसऱ्या दिशेने नेतील, अशी अपेक्षा केली जात आहे.