For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छोट्या गावासमोर विशाल हिमखंड

07:00 AM Aug 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
छोट्या गावासमोर विशाल हिमखंड
Advertisement

टायटॅनिक चित्रपटात जहाज एका मोठ्या हिमखंडाला धडकून बुडत असल्याचे दृश्य आहे. जर असाच हिमखंड तुमच्या घराबाहेर आल्यास काय घडेल याचा विचार करा. ग्रीनलँडच्या लोकांना ही भीती सतावत आहे, त्यांच्या घराबाहेर एक अत्यंत  विशाल हिमखंड दाखल झाला आहे. पृथ्वीच्या उत्तर टोकावर वसलेल्या ग्रीनलँडमध्ये इनारसुइट नावाचे ठिकाण असून ते सध्या असाधारण नैसर्गिक संकटाला सामोरे जात आहे. येथील लोकांच्या घरानजीक एक विशाल हिमखंड वाहून आला असून आता हळूहळू किनाऱ्यानजीक सरकत आहे. हा बर्फाचा तुकडा आकारात विशाल असल्याने प्रशासन आणि रहिवाशांची झोप उडाली आहे.

Advertisement

हिमखंड जमिनीला धडकल्यास त्याच्या प्रभावाने विशाल लाटा उठू शकतात, या लाटा किनाऱ्यानजीकच्या घरांना आणि सुविधांना थेट नुकसान पोहोचवू शकतात, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. बर्फाचे तुकडे थेट जमिनीवर कोसळण्याची शक्यता कमी आहे, परंतु ते पाण्यात कोसळल्याने शक्तिशाली लाटा निर्माण होतील आणि मोठे नुकसान घडवून आणतील असे तज्ञांचे मानणे आहे. इनारसुइट पश्चिम ग्रीनलँडमधील एका छोट्या बेटावर स्थित आहे. येथील अर्थव्यवस्था मासेमारीवर निर्भर आहे. लोकांनी समुद्रात जाणे टाळावे आणि दैनंदिन कृत्यांमध्येही सावधगिरी बाळगावी असे प्रशासनाने म्हटले आहे.

काही घाबरलेले, काहींमध्ये उत्साह

Advertisement

हिमखंड काही दिवसांमध्ये पुढे सरकतात, असे अनेकदा दिसून आले आहे, परंतु यावेळी स्थिती वेगळी आहे. स्थानिक कर्मचारी डेनिस लेहटोनन यांच्यानुसार हा हिमखंड मागील एक आठवड्यापासून स्थिर आहे आणि हेच चिंतेचे मोठे कारण आहे. या विशाल हिमखंडामुळे काही लोक भयभीत आहेत, तर काही लोकांमध्ये यावरून उत्साहही दिसून येत आहे. इनारसुइटला अशाप्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्याची ही पहिली वेळ नाही. 2018 मध्ये देखील एक विशाल हिमखंड याच बंदरात वाहून आला होता, त्याचे वजन सुमारे 11 टन होते आणि तो अंतराळातूनही दिसून येत होता. हा हिमखंड जोरदार वाऱ्यांमुळे हळूहळू वाहत गेल्याने नुकसान टळले होते. यावेळीही जोरदार वारे किंवा सागरी प्रवाह या हिमखंडाला दुसऱ्या दिशेने नेतील, अशी अपेक्षा केली जात आहे.

Advertisement
Tags :

.