आंबोली मुख्य धबधब्यावर पर्यटकांची तूफान गर्दी
04:21 PM Jun 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वार्ताहर/ आंबोली
फोटो - विजय राऊत
Advertisement
पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आंबोलीतील मुख्य धबधब्यावर आज रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली . यावेळी मुख्य धबधब्याचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. कावळेसाद पॉईंट तसेच मुख्य धबधब्याच्या परिसरात वाहनांचे पार्किंग फूल झाले होते. परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने वाहतूक कोंडी कमी प्रमाणात झाली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण स्वतः पेट्रोलिंग करीत असल्याने पोलिसांमध्ये उत्साह पाहायला मिळाला .मद्यपी पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आंबोली पोलीस व्हॅन पेट्रोलिंग करीत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
Advertisement
Advertisement