कोट्यावधी खर्च करत हुबेहुबे कार्टूनसारखे घर
शिन-चॅनचा चाहता होता 21 वर्षीय युवक
शिन-चॅन हे लहान मुलांचे पसंतीचे कार्टून राहिले असेल. मागील अनेक दशकांपासून लहान मुलांपासून मोठी माणसंही याची चाहती राहिली आहेत. प्रत्यक्षात हे कार्टून जपानचे आहे, परंतु चीनमधील एका युवकामध्ये यावरून प्रचंड प्रेम दिसून आले आहे. चीनचा हा युवक शिन-चॅनचा एक मोठा चाहता होता की त्याने घरालाच शिन-चॅनसारखे करून सोडले आहे. चीनच्या या युवकाचे घर पाहिल्यावर हे कार्टूनमधील घराप्रमाणे दिसत असल्याचे कळते. युवकाने घरातील प्रत्येक छोट्यातील छोट्या गोष्टीची काळजी घेतली आणि फर्निचर देखली शिन-चॅनच्या घराप्रमाणे तयार पेले आहे. सोशल मीडियावर घराचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
घराच्या रंगापासून भिंती आणि बाल्कनीचे ग्रिल देखील शिन-चॅनप्रमाणे आहे. घरातील भिंतींच्या रंगापासून टेबल-खूर्ची सर्वकाही कार्टूनमधील घराप्रमाणे तयार करण्यात आले आहे. याचमुळे हे घर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घराच्या निर्मितीकरता 3.5 कोटीहुन अधिक रक्कम खर्च झाली आहे. हे घर हुझोउ शहराच्या हेफू टाउनच्या सिलायान गावात तयार करण्यात आले आहे. शेन युहाआने स्वत:च्या स्वप्नाला साकार करण्यासाठी एक वर्ष काम केले आहे. 21 वर्षांचा हा युवक ग्रॅज्युएशननंतर स्वत:च्या घरी परतला आणि त्याने स्वत:च्या गावाला लोकप्रिय पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून दिला आहे. शेनने घराला कार्टूनसारखे स्वरुप देण्यासाठी मोठी मेहनत केली आहे. चीनमध्ये क्रेयॉन शिन-चॅनसाठी विशेष लायसेंन्सिंग एजंटचा शोध त्याने घेतला. तर त्याच्या आईने या प्रकल्पाकरता आर्थिक सहाय्य केले आहे.
फोटोग्रॉफी स्पॉट
हे घर आता जवळपास तयार झाले असून ते 100 चौरस मीटरमध्ये उभारण्यात आले आहे. कस्टम निर्मित गोष्टींपासून हे घर उभारण्यात आले आहे. हा अनोखा प्रोजेक्ट जुलै महिन्यात सुरू झाला होता आणि आता हे लोकप्रिय फोटोग्राफी स्पॉट ठरण्याच्या मार्गावर आहे. या घरात एक जुनी कार असून जिला हिरव्या रंगाच्या कारमध्ये बदलण्यात आले आहे. शेनचा उद्देश पूर्ण कासुकाबे शहराची निर्मिती करणे असून जेथे शिन-चॅनची कहाणी आहे.