20 कोटी वर्षे जुन्या खडकाने घेरलेले घर
कमालीचे आहे लोकेशन
जगात अशी अनेक घरं आहेत, ज्यांना पाहण्यासाठी लोक दूरवरून येत असतात. परंतु एक घर 20 कोटी वर्षे जुन्या खडकाने घेरलेले आहे. हे घर स्वत:चा लुक, डिझाइन, इंटिरियर आणि खास स्वरुपात आसपासच्या खडकामुळे चर्चेत आहे. हे घर अमेरिकेयच कोलोराडो येथे असून आता विकले जात आहे. या घराच्या आकर्षक लोकेशमुळे या घराची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. हे आलिशान घर कोलोराडोच्या लार्कसपूरमध्ये आहे. याला घराला द रॉक हाउस नावाने देखील ओळखले जाते. या घराची निर्मिती 2000 साली करण्यात आली होती, या घराचा आकार 2432 चौरस फुटांचा आहे.
या घराच्या भिंती खडकाला भिडलेल्या असल्याने हे घर नेहमीच खडकादरम्यान निर्माण करण्यात आल्याचे वाटते. हे घर 20 कोटी वर्षे जुन्या खडकाने वेढलेले असल्याने या घराला सौंदर्य प्राप्त झाले आहे. मोठमोठे बिल्डर हे घर खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. द रॉक हाउचा लुक, डिझाइन आणि इंटीरियर अत्यंत सुंदर आहे. या घरात दोन बेडरुम्स आहेत. या घरात शिरल्यावर तुम्हाला एका दगडाच्या घरात पोहोचल्याचे वटेल. येथे कुठेच भिंती नाहीत, तर केवळ खडकांचा वापर भिंतीच्या स्वरुपात करण्यात आला आहे. या घराची किंमत 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
रॉकी माउंटेन नॅशनल पार्क
देशविदेशातील पर्यटक कोलोराडोच्या रॉकी माउंटेन नॅशनल पार्क पाहण्यासाठी येत असतात. येथे संरक्षित पर्वत, जंगल पाहायला मिळतात. हा ट्रेल रिज रोड आणि ओल्ड फॉल रिव्हर रोडसाठी ओळखला जातो, जो एस्पेन वृक्ष आणि नद्यांमधून जातो. या नॅशनल पार्कमध्ये 10 हजार फुटांपेक्षा अधिक उंच 118 शिखरं आहेत. ज्यात 77 पर्वतशिखर 12 हजार फुटांपेक्षा अधिक उंच आहेत.
कोलोराडोचे वैशिष्ट्या
कोलोराडोमध्ये पर्वत, खोरे, बर्फ आणि सनसेट-सनराइजसाठी आकर्षक ठिकाण आहे. येथे फिरण्यासाठी अनेक पर्यटनस्थळं आहेत. येथे हॉट एअर बलूनमध्ये बसून पर्वतांची सैर करता येते. टेलुराइटमध्ये संगीत समारंभात भाग घेत नाइट लाइफचा आनंद घेता येतो.