For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वळीव पावसाच्या माऱ्याने टिळकवाडीत घर कोसळले

11:36 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
वळीव पावसाच्या माऱ्याने टिळकवाडीत घर कोसळले
Advertisement

बेळगाव : दोन दिवस कोसळलेल्या वळीव पावसामुळे आगरकर रोड, टिळकवाडी येथील एक आऊटहाऊस कोसळले. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही. सोमवारी व मंगळवारी रात्री पावसाच्यावेळी आगरकर रोड येथील परमानंद नाईक यांच्या घराच्या आऊटहाऊसच्या भिंती व छत कोसळले आहे. या आऊटहाऊसमध्ये काही विद्यार्थी रहात होते. ही घटना घडली त्यावेळी कोणीही नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.