महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चव्हाट गल्ली येथे पावसामुळे घर कोसळले

11:44 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे चव्हाट गल्ली येथील एक घर कोसळून मोठे नुकसान झाले आहे. कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली जीवनावश्यक वस्तू तसेच साहित्य सापडून नुकसान झाले आहे. मात्र सुदैवानेच या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. चव्हाट गल्ली येथील भाऊ सहदेव शहापूरकर, जयदेव मोनाप्पा शहापूरकर यांच्या मालकीचे घर आहे. यामध्ये जवळपास चार लाखाचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर तातडीने घरामधील साहित्य बाहेर काढले. मात्र काही साहित्य मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article