कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : ढालगावमध्ये शॉर्टसर्किटने घराला भीषण आग; दीड लाखांचे नुकसान

05:43 PM Oct 20, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                      शॉर्टसर्किटने आग लागून दीड लाखांवर नुकसान

Advertisement

ढालगाव : कमल बापू माने यांच्या घराला आज दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून दीड लाखावर नुकसान झाले, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. ढालगाव ढालेवाडी रस्त्यावरील कमल बापू माने यांच्या घरी गोपाल सुरेश मायने हे भाड्याने राहत होते मात्र घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर पडल्यामुळे घरी कोणीच नव्हते.

Advertisement

दरम्यान बाराच्या सुमारास कमल माने यांच्या घरातून धूर बाहेर येत असल्याचे सचिन सरगर, गोविंद टिंगरे, संजय दळवी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेजारी स्वराज निधी लिमिटेड या कर्मचाऱ्यांच्या कानावर घातले. अविराज बोराडे यांनी दरवाजा उघडला तर घरातून आगीच्या ज्याला दिसल्यावर त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत संसारपयोगी साहित्य, खाक झाले होते.

ही घटना समजतात सरपंच संजय घागरे माजी सभापती विकास हाके यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. तसेच ग्राम महसूल अधिकारी शंकर वाघमोडे व ग्राम विकास अधिकारी विकास माने यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये एक लाख ५२ हजार ५०० इतके नुकसान झाल्याचे म्हंटले असले तरीही हे नुकसान जास्त आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
#FireAwareness#HouseFireMaharashtra#ShortCircuitAccident#VillageFireIncidentsangli news
Next Article