केवळ वृत्तपत्रांद्वारे उभारण्यात आलेले घर
पेपरच्या भिंती अन् फर्निचर देखील
जगात क्रिएटिव्ह लोकांची कुठलीच कमतरता नाही. घरातील जुनी वर्तमानपत्रांना रद्दीत विकण्यात येते, किंवा अनेकदा त्यांचा वापर छोट्या-छोट्या कारणांसाठी केला जा तअसतो. परंतु एका इसमाने वर्तमानपत्रांचा वापर करत पूर्ण घरच उभे केले आहे. हे घर पाहण्यासाठी लोक आता पैसे खर्च करत आहेत.
हे घर अमेरिकेतील मॅसाच्युसेट्समध्ये आहे. येथे राहणारे मॅकेनिकल इंजिनियर एलिस स्टेनमॅन यांनी स्वत:च्या रचनात्मकतेला साकार करत हे घर 1922 मध्ये निर्माण केले होते. हे घर एका प्रयोगादाखल होते. जर वर्तमानपत्राद्वारे एखादी गोष्ट तयार केली तर ती किती दिवसांपर्यंत टिकू शकते हे पाहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वीज आणि पाण्याचा मारा झेलत हे घर किती काळापर्यंत उभे राहू शकते हे त्यांना पहायचे होते. त्यांच्या या प्रयोगाचा निष्कर्ष आता जगासमोर आहे, कारण 100 वर्षांनंतरही वर्तमानपत्राद्वारे तयार करण्यात आलेले हे घर जशास तसे उभे आहे.
या घरात एकूण 1 लाख जुन्या वर्तमानपत्रांना वॉर्निश करून वापरण्यात आले आहे. याचे छत, भिंत आणि फ्रेम देखील वर्तमानपत्राद्वारेच तयार करण्यात आलेले आहे. भिंती अर्धा इंच रुंदीच्या आहेत. घरातील फर्निचर देखील वर्तमानपत्रांना रोल करून वॉर्नेंश लावून तयार करण्यात आले आहे. खुर्च्या, कपाटं, टेबल्स अणि लॅम्प देखील वर्तमानपत्राद्वारेच तयार करण्यात आले आहे. 1942 मध्ये याचे इंटिरियर देखील पूर्ण झाले. आज देखील पेपर हाउस एप्रिलपासून ऑक्टोबरपर्यंत खुले असते आणि लोक येथे येत फिरू शकतात.