आत्म्यांसाठी तयार केलेले घर
160 खोल्या अन् 10 हजार खिडक्या
अमेरिकेच्या पॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील विंचेस्टर मिस्ट्री हाउसला भुताटकीयुक्त मानले जाते. या घरात असे जिने आहेत, जे कुठेच जात नाहीत. तर अनेक गुप्त मार्ग असून घराचा आर्किटेक्ट इतिहासाला दर्शविणारा आहे. हा व्हिक्टोरियन काळातील वाडा देशाच्या सर्वात प्रसिद्ध भुताटकीयुक्त घरांमध्ये गणला जातो. याची भीतीदायक प्रतिमा त्याच्या भूतकाळाशी निगडित असू ज्यात दु:ख, अंधश्रद्ध आणि शतकांपेक्षा जुन्या कहाण्या सामील आहेत.
1923 पासून जगभरातील लोक विंचेस्टर आणि त्याच्या रहस्यमय घराशी निगडित अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी येथे येत असतात. बहुतांश लोक प्रेरित होऊन जातात आणि काही उत्तरांपेक्षा अधिक प्रश्न घेऊन परततात, असे विंचेस्टर मिस्ट्री हाउसचे कार्यकारी संचालक वॉल्टर मॅग्नसन यांनी म्हटले आहे.
मुलगी अन् पतीच्या मृत्यूनंतर मालमत्ता विकली
1866 मध्ये सारा विंचेस्टर नावाच्या महिलेची नवजात कन्या एब्बीचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर 1881 मध्ये तिच्या पतीचा मृत्यू झाला. यानंतर त्रस्त होत साराने सर्व संपत्ती विकली. तिच्याकडे चांगली संपत्ती होती, परंतु घरात सोबत राहण्यासाठी कुणीच नव्हते. भाषातज्ञ आणि हॉन्टिंग एमकेच्या लेखिका करेन स्टोलज्नो यांनी साराची वास्तुकलेत रुची होती आणि गोपनीयतेची इच्छा होती, अशी माहिती दिली. त्यानंतर साराने न्यू हेवन, कनेटक्टिकट येथील स्वत:चे घर सोडले आणि पश्चिमेच्या दिशेने प्रस्थान केले होते.
भूलभुलैयासारखे घर
1884 मध्ये साराने कॅलिफोर्नियाच्या सांता क्लारा खोऱ्यात एक अर्धवट 8 खोल्यांचा फार्महाउस खरेदी केला, 1922 मध्ये साराच्या मृत्यूपर्यंत याचे काम सुरू राहिले. कुठल्याही औपचारिक ब्लूप्रिंट किंवा मास्टर प्लॅनशिवाय हे साधारण घर 24 हजार फूटांच्या एका भूलभुलैयात रुपांतरित झाले. ज्यात 160 खोल्या आणि 10 हजार खिडक्या, 2 हजार दरवाजे आणि असंख्य वास्तुशिल्पीय वैशिष्ट्यो होती. हे घर इतिहासाची आठवण करून देणारे असून अत्यंत सुंदर आहे.
आत्म्यांच्या आनंदासाठी निर्मिती
सारा जिवंत होती, तेव्हा ती विंचेस्टर रायफल्सद्वारे मृत्यू झालेल्या लोकांच्या आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी हे घर निर्माण करवत असल्याचे लोक सांगायचे. याचमुळे या घराला भूताटकीयुक्त युक्त म्हटले जाऊ लागले आणि आजही हाच प्रकार याच्या ओळखीचा हिस्सा आहे.
एकटीच राहायची सारा
या घराचे डिझाइन अत्यंत गुंतागुंतीचे असून भूलभुलैयासारखे असल्याने लोक सहजपणे भ्रमित होतात, अशा स्थितीत साधारण घटना देखील त्यांना अलौकिक किंवा भुताटकीयुक्त वाटू लागतात. साराला अध्यात्म आणि आत्म्यांमध्ये मोठी रुची होती. ती डोक्यावरून पदर घ्यायची आणि बहुतांशवेळ एकटीच राहायची. परंतु याचे कारण बहुधा तिचा रुमेटॉइट गाठ असू शकते.