For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपमानाचे पैसे घेणारे हॉटेल

07:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपमानाचे पैसे घेणारे हॉटेल
Advertisement

सर्वसाधारणपणे, आपल्या नेहमीच्या जीवनात (आणि जेवणातही) तोचतोचपणा टाळण्यासाठी हॉटेलांमध्ये जाण्याची पद्धत आहे. काही जणांना मात्र, परिस्थितीमुळे प्रतिदिन हॉटेलाचीच वारी करण्याखेरीज गत्यंतर नसते. कारण काहीही असले तरी, हॉटेलात गेल्यानंतर आपल्याला आपुलकी मिळावी, चांगली सेवा मिळावी आणि आनंद मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. किमानपक्षी हॉटेल चालकांकडून आपला अपमान होऊ नये आणि मनस्ताप होऊ नये, एवढे तरी वाटतच असते. तथापि, ब्रिटनची राजधानी लंडनच्या बर्नेट भागात एक हॉटेल असे आहे, की जेथे चांगली सेवा तर सोडाच, साधी सन्मानाची वागणूकही ग्राहकांना दिली जात नाही. इतकेच नव्हे, तर ग्राहकाने हॉटेलात प्रवेश केला की त्याचा अपमानच केला जातो. त्याची खिल्ली उडविली जाते. त्याच्यावर टोमणे मारले जातात. हे करण्यात या हॉटेलचा कर्मचारीवर्ग अगदी प्रवीण आहे. तरीही या हॉटेलात गर्दी असते. नेहमी हे हॉटेल ग्राहकांनी भरलेले असते. कारण, येथे ग्राहक मुळी स्वत:ची अवमानना करुन घेण्यासाठीच जातात. हॉटेलच्या कर्मचारीवर्गाकडून उलटी उत्तरे ऐकणे, स्वत:ची थट्टामस्करी करुन घेणे आणि विविध मार्गांनी स्वत:चा अपमान करुन घेणे याची येथे येणाऱ्या ग्राहकांना जणू हौसच असते. बरे, हा अपमान त्यांना विनामूल्य मिळत नाही. त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. असे पैसे मोजूनही अनेक ग्राहक या हॉटेलात जातात. कळस म्हणजे, हे हॉटेल स्वत:ची जाहिरातही अशीच करते. येथे ग्राहकांना प्राथमिक सुविधाही दिल्या जात नाहीत. या हॉटेलात एक रात्र राहण्याची किंमत 20 हजार रुपये आहे. तरीही लोक तिथे जातात. असा पैसे देऊन स्वत:चा अपमान करुन घेतल्याने मनाला हलके वाटते, तसेच मानसिक ताणतणाव दूर होतात, असा अनुभव ग्राहक कथन करतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.