कोंबड्याच्या आकाराचे हॉटेल
इंटरनेटवर व्हायरल फिलिपाईन्सचे रिजॉर्ट
जगातील कोंबड्याच्या आकारातील सर्वात मोठी इमारत तुम्ही पाहिली आहे का? जर पाहिली नसेल तर ती पाहण्यासाठी तुम्हाला फिलिपाईन्सचा प्रवास करावा लागणार आहे. ही इमारत वास्तुकला आणि स्थापत्यशास्त्रात रुची राखणाऱ्या लोकांना अत्यंत पसंत पडणार आहे. ही इमारत कॅम्पुएस्टोहनच्या नेग्रोस ऑक्सिडेंटलमध्ये निर्माण करण्यात आली असून ही विशाल संरचना कॅम्पुएस्टोहान हायलँड रिजॉर्टचा हिस्सा आहे.
या इमारतीची लांबी सुमारे 115 फूट आणि रुंदी सुमारे 40 फूट आहे. 92 फूट लांब प्रभावशाली मापाची ही इमारत तयार करणे सोपे नव्हते. कोंबड्याच्या आकारातील या इमारतीत 15 खोल्या असून त्या सर्व प्रकारच्या सुविधांनी युक्त आहेत. या इमारतीच्या निर्मितीची कल्पना रिकार्डो कैनो ग्वापो टॅन यांची आहे. त्यांच्या पत्नीने मूळ स्वरुपात रिजॉर्टसाठी जमीन खरेदी केली होती. ज्यावर विशाल कोंबड्याच्या आकारातील इमारत निर्मितीचे काम सुरू झाले. 6 महिन्यांच्या नियोजनानंतर 10 जून 2023 रोजी काम सुरू झाले होते. हे काम 8 सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण झाले आहे. या संरचनेने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.
वादळादरम्यान ही इमारत कशाप्रकारे मजबूत केली जावी हे याच्या निर्मात्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने या इमारतीला प्रेरणादायी म्हणून निवडले आहे. माझ्याकडे जनतेसाठी प्रशंसेच्या पाऊलखुणा उमटविणारे काही तरी निर्माण करण्याचे माझे स्वप्न होते. नेग्रोस ऑक्सिडेंटलनजीक एक गेमफॉवल उद्योग असून तो फिलिपाईन्सच्या लाखो लोकांना रोजगार देतो. या कोंबड्याच्या आकारातील इमारतीकडे पाहिल्यास तो शांत, आज्ञाधारक आणि प्रभावशाली दिसतो, ही इमारत आमच्या लोकांचे वर्तन दर्शविते असे टैन यांनी म्हटले आहे.