केवळ मीठाने तयार झालेले हॉटेल
भिंतींना जीभ लाऊन करतात पडताळणी
जगात अनोख्या इमारती आणि हॉटेलची कमतरता नाही. परंतु दक्षिण अमेरिकेच्या अँडीज पर्वतात जगातील सर्वात अजब हॉटेल असून ते केवळ मीठाद्वारे तयार करण्यात आले आहे. यात फर्निचर, भिंती, फ्लोरिंग, मूर्ती सर्वकाही मिठाद्वारे तयार करण्यात आले आहे. एवढेच नव्हे खाद्यपदार्थही केवळ मिठाचेच असतात.
बोलिवियाच्या कोरड्या पडलेल्या ऐतिहासिक सालार डि उईयूनी या सरोवराच्या काठावर हे हॉटेल असून याचे नाव पॅलासियो डि साल आहे. याचा अर्थ मीठाचा महाल असा होतो. याच्या काठांवर 4 हजार चौरस मैल आकाराचे मीठाचे वाळवंट आहे. या हॉटेलमध्ये खांब आणि भिंती देखील मिठाद्वारेच तयार करण्यात आल्या आहेत.
काही खोल्यांमध्ये फरशींना मीठाद्वारे तयार वाळूने झाकण्यात आले आहे तसेच मिठाद्वारे पांढऱ्या रंगाचा सोफा तयार करण्यात आला आहे. येथील रेस्टॉरंटमध्ये नमकीन डिशेस असून त्यात लामाचे मीट, चिकन देखील सामील आहे. येथे येणारे ग्राहक अत्यंत आनंदी असतात आणि अनेक जण येथील भिंत किंवा फर्निचरला जीभ लाऊन ती खरोखरच मिठाद्वारे तयार केली आहे का हे तपासत असतात असे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या हॉटेलच्या इमारतीचा बाहेरील हिस्सा अन् छतावरील गुबंद देखील मिठाद्वारे निर्माण करण्यात आले आहे. या हॉटेलच्या निर्मितीतत 36 सेंटीमीटरच्या मिठाच्या दाण्याद्वारे निर्मित सुमारे 10 लाख ब्लॉक्सचा वापर करण्यात आला आहे. 10 हजार टन वजनी या इमारतीच्या निर्मितीकरता 2 वर्षांचा कालावधी लागला होता.
या हॉटेलच्या खोल्यांमधून दक्षिण अमेरिकेच्या विशाल वाळवंटाचे दृश्य दिसून येते. येथील हॉटेलच्या स्पामध्ये सॉल्ट वॉटर बाथचा वापर करण्यात येतो. बोलिवियाचे हे हॉठेल समुद्रसपाटीपासून 12 हजार फुटांच्या उंचीवर आहे.