Solapur News : किल्लारीत रानडुकरांचे थैमान ; पिकांचे प्रचंड नुकसान
किल्लारी परिसरात रानडुकरांचा उच्छाद
किल्लारी : अनेक दिवसांपासून किल्लारीत रान हुकराने थैमान घातले आहे. किल्लारी, गुबाळ, मंगरूळ, गांजणखेडा व नदी काठच्या शेत शिवारात रानडुकराचा मुक्तसंचार पहावयास मिळत आहे. त्यामध्ये दोन मोठे, पाच ते सहा लहान जनावरे असून रातोरात शेतातील मका, ऊस, तूर अशा विविध पिकात घुसून पिकाची नासधूस करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यातून संतापाची लाट उसळली आहे.
शेतातील मोलमजुरी करण्यासाठी मजूर धास्तावले आहेत. रान डुकरांच्या भीतीने शेतकरी हतबल झाला आहे. वर्षभर रात्रंदिवस पीक जोमाने आणतात. तासभरातच रान डुकराने पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.
हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून होत असून शेतकरी शेतात जाण्यासाठी धास्तावला आहे. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला तर तो चावा घेण्यासाठी येत आहे, असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. रान डुक्कर दिवसा जंगल भगात लपत असून रात्री शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करत आहेत. सबंधित अधिकारी व वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी याचा बंदोबस्त करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.