अनोख्या कामासाठी घसघशीत पगार
मृतदेहाजवळ 10 मिनिट बसविण्यासाठी 25 हजार, स्वत:च्या हाताने तयार करतो स्वत:चे अन्न
जर तुम्हाला बेवारस मृतदेहाजवळ 10 मिनिटांसाठी बसण्यास सांगितले तर तुम्ही बसाल का? याचे उत्तर बहुतांशकरून नाही असेल. परंतु जर तुम्हाला मृतदेहाजवळ 10 मिनिटे बसण्यासाठी 25 हजार रुपये मिळाल्यास तुम्ही बसाल का? सोशल मीडियावर अशाप्रकारच्या जॉबची जाहिरात प्रसारित झाली आहे. चीन या देशामध्ये अशाप्रकारचा जॉब निघाला आहे. चीनमध्ये मृतदेहानजीक 10 मिनिटे बसण्यासाठी पगारादाखल 25 हजार रुपये मिळणार आहेत. याकरता अर्जदारांना एका चाचणीत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे.
रुशान झिनमाइक ह्यूमन रिसोर्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने ही जॉब ऑफर काढली आहे. या जॉबमध्ये अर्जदाराला 10 मिनिटांसाठी अत्यंत थंड वातावरणात मृतदेहानजीक बसावे लागेल. याचबरोबर अर्जदाराची मानसिक अणि शारीरिक चाचणीही होईल. या जॉबसाठी 45 वर्षांपर्यंतच्या लोकांना अर्ज करता येणार आहे. यात 24 तासांची शिफ्ट असणार आहे.
फ्रीजिंग टेस्टसोबत अर्जदाराची पार्श्वभूमीही पडताळुन पाहिली जाणार आहे. तसेच वैद्यकीय तपासणी आणि मग मुलाखत होईल. नोकरी मिळाल्यावर संबंधिताला 6 महिन्यांचा प्रोबेशन पीरियड पूर्ण करावा लागेल. ज्यानंतर योग्यतेच्या आधारावर जॉबमध्ये कायम केले जाणार आहे.
रात्रपाळीसाठी अतिरिक्त रक्कम
रुशानच्या लोकांना या जॉबसाठी विशेष श्रेणीत ठेवले जाईल. तर नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांना अतिरिक्त पैसे मिळणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल या जाहिरातीबद्दल अनेक लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.