महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अधिवेशन काळात परिवहनची डोकेदुखी

10:50 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

100 बसेसची मागणी : सेवेवर वाढणार ताण, नियोजनाचे संकट

Advertisement

बेळगाव : बेळगाव सुवर्णसौध येथे दि. 4 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. यासाठी पोलीस खात्याने परिवहनकडे बस व्यवस्थेची मागणी केली आहे. परिवहनने पहिल्या टप्प्यात 50 बसेसची व्यवस्था केली आहे. मात्र एकूण 100 बसेस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बस व्यवस्थेचे अधिवेशन काळात तीनतेरा वाजणार आहेत. आधीच शक्ती योजनेमुळे बस व्यवस्थेवर ताण वाढला आहे. त्यातच अधिवेशनासाठी 100 बसेस गेल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे अधिवेशन काळात परिवहन कशा पद्धतीने नियोजन करणार, हे पहावे लागणार आहे. काँग्रेस सरकारने 11 जानेवारीपासून राज्यात शक्ती योजना लागू केली आहे. या अंतर्गत महिलांना मोफत प्रवास दिला जात आहे. त्यामुळे सामान्य बसला महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे जूनपासून बसचा प्रवास त्रासदायक ठरू लागला आहे. सामान्य प्रवासी विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला संघर्ष करत प्रवास करावा लागत आहे. तर काही ठिकाणी बसफेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. दरम्यान बस फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशा परिस्थितीत अधिवेशनसाठी परिवहनला 100 बसेसची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे परिवहनची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement

अधिवेशनाच्या काळात पोलीस, कर्मचारी व पत्रकार, अधिकारी, आंदोलनकर्त्यांसाठी बसचे नियोजन गरजेचे आहे. यासाठी परिवहनला काही राखीव बस ठेवाव्या लागणार आहेत. मात्र आधीच परिवहनच्या ताफ्यात बसेसचा तुटवडा आहे. त्यामुळे अधिवेशन काळात सामान्य प्रवाशांचे हाल होणार आहेत. सद्य परिस्थितीत विविध ठिकाणी बसेस कमी असल्याने चेंगराचेंगरीने प्रवास सुरू आहे. त्यातच अधिवेशनला 100 बसेस गेल्यास परिस्थिती आणखीन गंभीर होणार आहे. राज्यातील मंत्री महोदय, अधिकारी अधिवेशनासाठी शहरात दाखल होणार आहेत. दरम्यान सुरक्षेची जबाबदारी पोलीस खात्यावर राहणार आहे. यासाठी बाहेरुन पोलिसांचा ताफाही दाखल होणार आहे. पोलिसांची ने-आण करण्यासाठी बसेसची नितांत गरज भासणार आहे. त्यामुळे परिवहनला अधिवेशन काळात काही बसेस राखीव ठेवाव्या लागणार आहेत.या काळात दैनंदिन बसचा प्रवास त्रासदायक ठरणार आहे.

सध्या 50 बसेसची तजवीज

खात्याकडून बससाठी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या 50 बसेसची तजवीज केली आहे. अधिवेशन काळात पुन्हा 30 ते 40 बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी बाहेरुन बसेस मागविल्या जाणार आहेत.

के. के. लमाणी-डीटीओ बेळगाव

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article