महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पुष्पक’च्या यशस्वी लँडिंगची हॅटट्रीक

06:23 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रोकडून री-युजेबल लाँच व्हेईकलचे परीक्षण : भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण

Advertisement

वृत्तसंस्था/ चित्रदुर्ग

Advertisement

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने रविवार, 23 जून 2024 रोजी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन (री-युजेबल लॉन्च व्हेईकल) तंत्रज्ञानाची तिसरी यशस्वी चाचणी करत ‘हॅटट्रीक  साधली. इस्रोचे ‘पुष्पक’ प्रक्षेपण वाहन रविवारी सकाळी 7.10 वाजता कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी श्रेणीत यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले. या यशस्वी चाचणीच्या माध्यमातून भारताने उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात जगात आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. आता ‘पुष्पक’ची कक्षीय पुनर्प्रवेश चाचणी घेण्याचा इस्रोसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

इस्रोने रविवारी डीआरडीओ आणि भारतीय हवाई दल (आयएएफ) यांच्या सहकार्याने रविवारी सकाळी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर (एटीआर) ही मोहीम पार पडली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा वापरता येणारे प्रक्षेपण वाहन अवकाशात पाठवल्यानंतर ते पृथ्वीवर परतले. याद्वारे आणखी एक उपग्रह पुन्हा प्रक्षेपित केला जाऊ शकतो. आतापर्यंत उपग्रह प्रक्षेपण वाहने आकाशात गेल्यावर नष्ट होत होती. सुऊवातीला विंग बॉडीचे विमान हेलिकॉप्टरमधून साडेचार किलोमीटर उंचीवर नेण्यात आले आणि विमानाप्रमाणे धावपट्टीवर उतरण्यासाठी सोडण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली. हवाई पट्टीवर उतरवताना रॉकेटला थांबवण्यासाठी ब्र्रेक पॅराशूट सिस्टिमसह अनेक विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

 

‘पुष्पक’ची खासियत...

पुष्पक हे एक खास प्रकारचे स्पेस शटल आहे. जे अवकाशात उपग्रह आणि माल वाहून नेण्याचे काम करेल. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 10,000 किलोपेक्षा जास्त वजन वाहून नेण्यासाठी हे प्रक्षेपण वाहन उपयुक्त ठरेल. ‘पुष्पक’ पूर्णपणे स्वदेशी असल्याची माहिती इस्रोकडून निवेदनाद्वारे देण्यात आली. यापूर्वी एप्रिल 2023 आणि मार्च 2024 अशा दोनवेळा इस्रो, डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे त्याची लँडिंग चाचणी घेतली होती.

सध्या अनेक मोठे देश पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपक वाहनांवर काम करत आहेत. एलन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही कंपनी पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपक वाहनाची चाचणी यशस्वी करणारी पहिली खासगी संस्था ठरली होती. ‘स्पेस एक्स’ने 2015 मध्ये पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपक वाहन यशस्वीरित्या उतरवले होते. फ्रान्स, अमेरिका, जपान, चीनसह अनेक खासगी संस्थादेखील पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपक वाहनांवर काम करत आहेत.

‘आरएलव्ही’मुळे आर्थिक बचत

‘आरएलव्ही’ हे भारतीय संरक्षण संशोधन संस्था आणि भारतीय हवाई दलाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ‘आरएलव्ही’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपग्रह पाठवण्याचा खर्च कमी होईल. तसेच भारताला भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमा कमी खर्चात पूर्ण करणे शक्य होणार आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार, ‘आरएलव्ही’ हे मुळात एक स्पेस प्लेन असून त्याची रचना खूप उंचावरून ताशी 350 किलोमीटर वेगाने लँडिंग करण्यासाठी केली गेली आहे.

‘चिनूक’मधून 4.5 किमी उंचीवरून पुष्पक सोडले...

इस्रोने ‘पुष्पक’ सलग तिसऱ्यांदा यशस्वीरीत्या उतरवून मोठे यश मिळवले आहे. ‘पुष्पक’ने जोरदार वाऱ्यांच्या झोतात आव्हानात्मक परिस्थितीत प्रगत स्वायत्त क्षमता दाखवून अचूक लँडिंग केल्याचे इस्रोने आपल्या निवेदनात म्हटले आहे. धावपट्टीपासून 4.5 किलोमीटरच्या उंचीवरून चिनूक हेलिकॉप्टरमधून सुटल्यानंतर ‘पुष्पक’ अतिशय कौशल्याने हवेतून मार्ग काढत धावपट्टीवर उतरले. याप्रसंगी त्याचा वेग कोणत्याही सामान्य विमान किंवा फायटर प्लेनपेक्षा खूपच जास्त होता. ताशी 320 किलोमीटर वेगाने उतरल्यानंतर ब्र्रेक पॅराशूटच्या मदतीने त्याचा वेग ताशी 100 किलोमीटरवर आणण्यात आला. यानंतर त्याच्या चाकांचे ब्र्रेक काम करू लागताच ते काही वेळाने पूर्णपणे थांबले. धावपट्टीवर स्वत:ला स्थिर ठेवण्यासाठी पुष्पकने ऊडर आणि नोज व्हील स्टिअरिंग सिस्टिमचा वापर केला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article