महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेत एआय ट्रेनर असलेली जिम भिंतीवरील सेंसर वर्कआउटला ट्रॅक करणार

06:01 AM Jan 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रत्येक क्षेत्राप्रमाणे फिटनेस अणि हेल्थमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजेन्स वेगाने विकसित होत आहे. एआयचा वापर करणाऱ्या फिटनेस अॅपची संख्या अनेकपटीने वाढत आहे. काही लोक लोकप्रिय एआय चॅटबॉट चॅटजीपीटीला देखील स्वत:साठी वर्कआउट प्रोग्राम तयार करण्यास सांगत आहेत. बहुतांश एआय फिटनेस अॅप एकट्याने वापरण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. परंतु अमेरिकेच्या डलासमध्ये ल्यूमिन फिटनेस नावाची पहिली अशी जिम सुरू करण्यात आली आहे, जेथे लोक एआर ट्रेनरसोबत व्यायाम करू शकतात.

Advertisement

एआर ट्रेन वर्कआउटदरम्यान करण्यात येणाऱ्या प्रत्ये हालचालीवर बोलून स्वत:चा फीडबॅक देऊ शकतो. जिमच्या भिंतींवर एलईडी स्क्रीन बसविण्यात आली असून या स्क्रीनच्या माध्यमातून एआय पर्सनल ट्रेनर एकाचवेळी 14 लोकांना प्रशिक्षित करू शकतो.

Advertisement

प्रत्येक सदस्याचे निरीक्षण

प्रत्येक व्यक्तीचे या जिममध्ये स्वत:चे असे एक स्टेशन असते, स्क्रीनमागील सेंसर व्यक्तीचा व्यायाम आणि विशेषकरून तयार करण्यात आलेली उपकरणे म्हणजेच डंबल, स्किपिंग रोपला ट्रॅक करतो. तर वर्कआउट करताना हेडफोनवर एआय स्वत:चे आकलन आणि निर्देश देत राहतो. जिममधील सेंसर प्रत्येक सदस्याचे निरीक्षण करतात आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर फीडबॅक देऊ शकतात. आम्ही मानवी प्रशिक्षकाचा पर्याय शोधत नसून आम्ही लोकांना उत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी उपकरण देत आहोत. एआयचे वैशिष्ट्या म्हणजे याची शिकण्याची क्षमता आहे. हे सध्या परिपूर्ण नाही, परंतु कालौघात एआय फिटनेस आणखी प्रभावी होत जाणार असल्याचे उद्गार ल्यूमिन फिटनेसचे सीईओ ब्रँडन बीन यांनी काढले आहेत.

भावनात्मक बुद्धिमत्तेला पर्याय नाही

तज्ञांच्या मतानुसार एआय चांगल्याप्रकारे प्रोग्राम करण्यात आल्यास तो लोकांच्या व्यायामात चांगली मदत करू शकतो. परंतु आरोग्य आणि फिटनेसमध्ये भावनात्मक बुद्धिमत्ता देखील सामील असते. एआय याचा पर्याय ठरू शकत नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article