For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॉरिशसच्या मराठी बांधवांचे उत्तम सांस्कृतिक सादरीकरण

06:16 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॉरिशसच्या मराठी बांधवांचे उत्तम सांस्कृतिक सादरीकरण
Advertisement

मॉरिशस येथील मराठी बांधवांची लेककला रत्नागिरीत सादर होण्याचा विशेष कार्यक्रम सोमवारी पार पडल़ा  त्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेने विशेष पुढाकार घेतला होत़ा आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक आदान-प्रदान करण्याच्या राष्ट्रीय धोरणाप्रमाणे अनेक कलाकार व साहित्यिक एकमेकांच्या देशात जात असतात़  त्याप्रमाणे हा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरल़ा

Advertisement

कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी साहित्य संमेलन अलीकडे मॉरिशस येथे पार पडल़े तेथील मराठी लोकांनी आपली संस्कृती जपून ठेवली आह़े येथील गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात़ तिथल्या टिकून ठेवलेल्या मराठी परंपरांची ओळख होण्याचा योग रत्नागिरीकरांसाठी वेगळाच होत़ा

मॉरिशस सरकार आणि तीन शासनमान्य मराठी भाषिक संस्थांनी एकत्र येऊन कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन डिसेंबर 2023 मध्ये यशस्वी केले होत़े सांस्कृतिक बाबींची आदान-प्रदान करण्यासाठी चर्चा झाली होत़ी या संमेलनादरम्यान मॉरिशसला मराठी ग्रंथालय सुसज्ज करण्यासाठी 500 पुस्तकांची भेट देण्यात आली होत़ी आणखी 500 पुस्तके दुसऱ्या टप्प्यात देण्याची योजना ‘कोमसाप’ने आखली आह़े

Advertisement

मॉरिशस येथे मराठी लोकांची संख्या लक्षणीय आह़े मराठी शाळासुद्धा चालवल्या जातात़ मॉरिशसमध्ये उसाच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी इंग्रजांनी अनेक भारतीयांना तेथे नेल़े सुरुवातीला कामगार म्हणून काम करणाऱ्या मराठी लोकांनी आज यशस्वीपणे प्रगती करत महत्त्वाच्या पदांवर स्थान मिळवले आह़े अनेक मराठी लोक सत्तेत देखिल सहभागी झाले आहेत़ महाराष्ट्रातील सांस्कृतिक घडामोडींबद्दल तेथील लोकांना विशेष आस्था आह़े मॉरिशसमधील बऱ्याच मराठी लोकांची मुळे कोकणात आहेत़ त्यामुळे कोकणाशी तेथील लोकांचा खास लगाव आह़े

या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत मॉरिशसच्या मराठी बांधवांच्या लोककलेचा कार्यक्रम गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडल़ा त्याला स्थानिक लोकांचा प्रतिसाद मिळाल़ा कोमसापचे अध्यक्षा नमिता कीर

मॉरिशस येथील संस्थेचे मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट मॉरीशचे अध्यक्ष अर्जन पुतलाजी, नितीन बाप्पू, इंटरनॅशनल कल्चर अॅsड सोशल फोरम मॉरिशसचे दिलीप ठाणेकर, रमेश कीर, जयु भाटकर आदींनी त्यासाठी योगदान दिल़े आपल्या भाषणात अर्जन पुतलाजी यांनी सांगितले की, पूर्वज गुलाम म्हणून तिथे गेले असले तरी भाषा व संस्कृती टिकवण्याचे काम झाल़े पुढे जोपासण्याचे काम सध्या चालू आह़े

यापूर्वी मॉरिशसमध्ये मराठी कलाकारांनी महाराष्ट्रात येऊन काही कार्यक्रम केले आहेत. ठाणे येथे एक नाट्याप्रयोग काही वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. तेव्हा ठाण्याच्या महापौरानी विशेष सहकार्य केले होत़े 1977 पासून मॉरिशस सरकार कला व सांस्कृतिक मंत्रालयाच्या पुढाकाराने मराठी नाटक महोत्सव आयोजित करण्यात येत़ो  तेथील स्थायिक लोक या महोत्सवात भाग घेतात़

कला, सांस्कृतिक उपक्रमांच्या आधारे परदेशांमध्ये मराठी बांधव आपले स्थान राखून आहेत़ अशा कार्यक्रमांच्याद्वारे मराठी लोकांची एकसंघता कायम राहत़े ही बाब आहेच, पण त्या बाहेर जाऊन बिगर मराठी भाषिक आणि अन्य नागरिक यांच्या सहयोगाने अनेक स्वरुपाचे आदान-प्रदानाचे अनेक सेतू जोडले गेले आहेत़

मॉरिशसच्या मंडळींनी विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. नृत्यातून गणेशवंदना, श्री विठ्ठल-रखुमाई वंदना सादर केली. कोळीनृत्याचेही सुरेख सादरीकरण केले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर कोळीनृत्य सादर करण्याची मोठी परंपरा आह़े ही परंपरा कायम राखून कित्येक वर्षे महाराष्टाच्या भूमीवरुन दूर राहिलेल्या या लोकांनी सांस्कृतिक एकत्वाचा वेगळा नमुना सादर केल़ा कोळीनृत्य बघताना आपण मॉरिशसमधल्या बांधवांचे नृत्य बघतो आहे, हे सांगावे लागत होत़े

महाराष्ट्रातल्या लोकांच्या इतकेच उत्तम सादरीकरण करण्यात आल़े मराठी भाषेत एकांकिकेचेही सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली.

केवळ नृत्य, नाट्या, साहित्यिक कार्यक्रम यापुरता सांस्कृतिक आदान-प्रदानाचा मुद्दा पुढे येत नाही तर हे मुद्दे सॉफ्ट पॉवर म्हणून याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले जात़े उत्तम सादरीकरण करणारे अभिनेते असोत किंवा संगीत साद करणारे कलाकार असोत़

उत्तमोत्तम गायक असोत अथवा संगीतकार त्यांच्यामुळे देशाची विशिष्ट ताकद उठून दिसत़े या ताकदीचे सादरीकरण आवश्यक त्या मंचावर केले जात़े मॉरिशसकडून आर्थिक क्षेत्रात भारतात मोठे गुंतवणूक केली जात़े कर रचना सुसंगत रहावी, यासाठी दोन देशांमध्ये करार लागू करण्याचा प्रस्ताव आह़े 1948 साली त्या देशाशी अधिकृत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले गेल़े आशियाई खंडामध्ये प्रमुख व्यापारी भागीदार म्हणून मॉरिशसकडे पाहिले जात़े त्या देशाची लोकसंख्या 12 लाख असून सुमारे 70 टक्के लोक मूळचे भारतीय आहेत़ यापूर्वी शैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील भारताने त्या देशाला मोठी मदत केली आह़े

केवळ मॉरिशसच नव्हे तर कोणत्याही देशात असलेल्या मराठी बांधवांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक करण्यासाठी स्थानिक मराठी लोक नेहमीच पुढे असतात़ रत्नागिरीकरांनीही मॉरिशसच्या सांस्कृतिक सादर केलेल्या नृत्य व नाट्या सादरीकरणाचे भरभरुन कौतुक केल़े भविष्यात सांस्कृतिक आदान-प्रदानाचे अनेक टप्पे पार पाडले जातील. यामुळे संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास दोन्ही बाजूच्या सांस्कृतिक अग्रणी लोकांनी व्यक्त केल़ा

सुकांत चक्रदेव

Advertisement
Tags :

.