श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने प्रतीवर्षाप्रमाणे यावर्षी श्रीराम नवमीनिमित्त रविवार दि. 6 रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज शहापूर या मार्गावर शोभायात्रा काढली जाणार आहे. यामध्ये विविध कलापथक तसेच वाद्य सहभागी असणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले. मराठा मंदिर येथे श्रीराम सेना हिंदुस्थानची रामनवमी शोभायात्रा पूर्वतयारी बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमाकांत कोंडुसकर होते. यावेळी कार्यकर्त्यांनी शोभायात्रेबद्दल आपली मते व्यक्त केली. शोभायात्रेमध्ये अधिकाधिक युवा वर्ग सहभागी करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.